ब्रेकिंग

मविप्रच्या सर्वेश कुशारेला एशियन गेम्समध्ये पुन्हा सिल्व्हर मेडल*

*मविप्रच्या सर्वेश कुशारेला एशियन गेम्समध्ये पुन्हा सिल्व्हर मेडल*

नाशिक : जन्मत  चंद्रकांत धात्रक कडून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा माजी विद्यार्थी व निफाड तालुक्यातील देवगांव येथील रहिवासी सर्वेश कुशारे याने कॉमन वेल्थ पाठोपाठ

 

 

 

जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेतदेखील आज (दि. २७) उंच उडीमध्ये सिल्व्हर मेडल पटकावत पुन्हा एकदा विक्रम केला आहे.
सर्वेश कुशारे याने २७ जुलै २०२६ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली होती. पुरुषांच्या उंच उडीत राष्ट्रकुल स्पर्धेचे रौप्यपदक जिंकणा सर्वेश कुशारे हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वेशने उंच उडीमध्ये वेगवेगळे विक्रम करून भारतासह मविप्र संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्वेशला मविप्र संस्थेतील निवृत्त क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव यांचे मार्गदर्शन लाभत असून, सिल्व्हर मेडल मिळविल्यानंतर सर्वेशने प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांना व्हिडिओ कॉल करून ही माहिती दिली आणि तुमच्या आशिर्वादामुळेच मी हे यश मिळवू शकलो, असे तो म्हणाला. या यशस्वी कामगिरीबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे