ब्रेकिंग

मविप्रची सेवक सहकारी सोसायटी महाराष्ट्रात अग्रगण्य : ॲड. नितीन ठाकरे*

*मविप्रची सेवक सहकारी सोसायटी महाराष्ट्रात अग्रगण्य : ॲड. नितीन ठाकरे*

* नाशिक जन्मत    ६४ व्या वार्षिक सभेत ऐतिहासिक निर्णय; सभासदांना ७.२५ टक्के लाभांश, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २५ लाखांपर्यंत कर्जमाफी*

नाशिक : सात टक्के व्याजदराने कर्जवाटप व त्याच दराने ठेवी स्वीकारूनही सभासदांना ७.१५ टक्के लाभांश देणाऱ्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीचे कामकाज कौतुकास्पद आहे. सभासदाभिमुख उपक्रम आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनामुळे ही पगारदार सहकारी सोसायटी महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून नावारूपाला येत असल्याचे गौरवोद्गार मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी काढले.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी लि., नाशिक यांच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित सेवानिवृत्त सभासद सत्कार तसेच गुणवंत सेवक व सेवक पाल्यांच्या गुणगौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी २०५ सेवानिवृत्त सभासदांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रत्येकी १३ हजार रुपये मानधन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच १३८ गुणवंत विद्यार्थी व १० गुणवंत सभासदांचा गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, चिटणीस दिलीप दळवी, कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲड. लक्ष्मण लांडगे, अमित बोरसे, रमेश पिंगळे, शिवाजी गडाख, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, सेवक संचालक चंद्रजीत शिंदे, माजी सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. के. एस. शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. डी. डी. जाधव, शशिकांत मोगल, डॉ. विलासकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

सोसायटीच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना ॲड. ठाकरे यांनी सभासदांच्या आर्थिक हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष दत्तराज ह्याळीज यांनी केले. आभार उपाध्यक्ष सुनील आहेर यांनी मानले, तर सूत्रसंचालन उगले सर यांनी केले. होरायझन अकॅडमीच्या गीतमंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
सत्कार समारंभानंतर सोसायटीचे अध्यक्ष दत्तराज ह्याळीज यांच्या अध्यक्षतेखाली ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुनील आहेर व मानद चिटणीस प्रा. अनिल भंडारे उपस्थित होते.
या समारंभास व सभेस सोसायटीचे मानद चिटणीस प्रा. अनिल भंडारे, संचालक नंदकुमार घोटेकर, विनीत पवार, सुनील काळे, ज्ञानेश्वर जाधव, मंगेश ठाकरे, बाबा मोरे, मनीष बोरसे, शांताराम चांदोरे, दत्तू पडोळ, बळीराम जाधव, किरण उघडे, प्रा. वैशाली कोकाटे, सुवर्णा कोकाटे, शांताराम सावंत आदी उपस्थित होते. तसेच सेवक वर्गातील साहेबराव जाधव, प्रवीण टर्ले, आशा अहिरे, पूनम पताडे, प्राजक्ता काळे, वैभव झाल्टे आदींची उपस्थिती होती.
*६ कोटी ६६ लाख ७८ हजार २३३ रुपये नफा*
सभेत सभासदांची दीर्घ मुदतीच्या कर्जाची मर्यादा २५ लाख रुपये, तर आकस्मिक कर्जाची मर्यादा ७५ हजार रुपये निश्चित करण्यात आली. कर्ज व ठेवींवरील व्याजदर समान सात टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संचालक मंडळाने मिटींग भत्ता न घेता तसेच प्रवास, जाहिरात, चहापान व टेलिफोन खर्चात भरीव बचत करून काटकसरीने कारभार केला. परिणामी, सोसायटीला या आर्थिक वर्षात ६ कोटी ६६ लाख ७८ हजार २३३ रुपये नफा झाला असून, सभासदांना ७.२५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

*सेवानिवृत्त सेवकांना प्रत्येकी १४ हजार रुपये मानधन देणार*
सभासदांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कर्जदार सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या ऐतिहासिक योजनेला मंजुरी देण्यात आली. बिगरकर्जदार मयत सभासदांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षापासून इन्शुरन्स पॉलिसीऐवजी प्रत्येक सभासदाकडून ८०० रुपये निधी जमा करून मयत सभासदांच्या वारसांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना प्रत्येकी १४ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

 

 

 

 


सभासदांच्या सोयीसाठी सोसायटीच्या बँक खात्याची क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यामुळे ऑनलाइन पैसे हस्तांतरित करणे सुलभ होणार आहे. सोसायटीचे ॲपही अद्ययावत करण्यात आले असून, सभासदांना वैयक्तिक खात्याचे स्टेटमेंट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे