ब्रेकिंग

नाशिक मनपाच्या दोन आरोग्य केंद्रांना NQAS मानांकन

सिडकोला ९०.६३, तर जिजामाता केंद्राला ८४.०१ टक्के गुण

नाशिक मनपाच्या दोन आरोग्य केंद्रांना NQAS मानांकन
सिडकोला ९०.६३, तर जिजामाता केंद्राला ८४.०१ टक्के गुण
नाशिक जंनमत   महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सिडको आणि जिजामाता शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत मानांकन प्राप्त झाले आहे. सिडको केंद्राने ९०.६३ टक्के, तर जिजामाता केंद्राने ८४.०१ टक्के गुण मिळवले आहेत.
आरोग्य केंद्रांच्या नियमित गुणवत्ता तपासणीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्यास केंद्र पुढील राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पात्र ठरते. राज्यस्तरावरही निर्धारित गुण प्राप्त केल्यानंतर NQAS साठी राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन केले जाते. याच प्रक्रियेत जुलै २०२६ मध्ये केंद्र शासनाच्या आरोग्य तज्ज्ञ समितीने दोन्ही केंद्रांचे बाह्य मूल्यांकन केले.
या मूल्यांकनात ओपीडी, प्रसूती कक्ष, प्रयोगशाळा, आंतररुग्ण विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, औषधांची उपलब्धता, रुग्णांचे हक्क आणि रुग्णांचे समाधान यांसह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. दोन्ही केंद्रांनी निर्धारित गुणवत्ता निकष पूर्ण केले.

 

 

यापूर्वी २०२२-२३ मध्ये सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दसक-पंचक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राला, तसेच २०२३ मध्ये एमएचबी कॉलनी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राला याच प्रकारचे NQAS मानांकन प्राप्त झाले आहे.
NQAS मानांकन तीन वर्षांसाठी वैध असून, मानांकन प्राप्त केंद्रांना केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळत

या यशासाठी महापौर हिमगौरी आडके/आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या मार्गदर्शनासह प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, डॉ. अजिता साळुंखे, डॉ. चारुदत्त जगताप आणि डॉ. हिना शेख यांचे विशेष योगदान राहिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे