संदीप विद्यापीठाचा एल अँड टी एज्युटेकमध्ये सामंजस्य करार
संदीप विद्यापीठाचा एल अँड टी एज्युटेकमध्ये सामंजस्य करार

नाशिक : जनमत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या
विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी संदीप विद्यापीठ आणि एल अँड टी एज्युटेक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. संदीप फाउंडेशमचे अध्यक्ष डॉ. संदीप झा आणि एल अँड टी -एज्युटेकचे रिजनल हेड मुरली अय्यर यांच्या उपस्थितीत करार झाला. या करारासंदर्भात झा यांनी शनिवारी (दि. १९) झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

संदीप विद्यापीठाच्या नाशिक आणि सिजोल येथील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळावा यासाठी एल अँड टीच्या

विविध साइट्सना भेटी आयोजित केल्या जातील. अभ्यासक्रमानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॅपस्टोन प्रोजेक्ट’ पूर्ण करावा लागणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या इंटर्नशिपनंतर कामगिरीच्या आधारे एल अँड टी किंवा सहयोगी कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. संदीप झा यांनी सांगितले..



