31 ऑक्टोबरला होणार ध्वजारोहण. मंत्री गिरीश महाजन यांनी गंगेवर जात केली कामाची पाहणी
वीस दिवसात कामे पूर्ण करण्याची मुदत

प्रतिनिधी । नाशिक जन्मतं कुंभमेळा ध्वजारोहण ची तारीख जवळ येत असून गोदावरी रामकुंडावरील अनेक कामे अपुरे आहेत ही कामी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वीस दिवसाची मुदत संपत आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री.आयुक्त. महापौर उपमहापौर स्थायी सभापती बांधकाम विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष रामकुंडावर जाऊन कामाची पाहणी केली.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील अपूर्ण विकासकामे पुढील २० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि. २०) दिले. रामकुंड, रामकालपथ आणि घाट परिसराची पाहणी करून त्यांनी अधिकारी, अभियंते व ठेकेदारांकडून कामांचा आढावा घेतला. सिंहस्थाचा प्रारंभ ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रामकालपथ कामांची पाहणी करताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन.

कुंभापुर्वी नवीन घाट, कुंडांसह रस्त्यांची कामे होणार पूर्ण
२० दिवसांची मुदत : रामकुंडावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश
नवीन घाट व कुंड : कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सांडपाणी व्यवस्था : गोदावरीत दूषित पाणी मिसळू नये यासाठी उपाय
रामकालपथ : रस्ते, मंदिरांच्या नावांच्या पाट्या व इतर कामे
भाविकांसाठी सुविधा : स्वच्छतागृहे, पेयजल, महिलांसाठी वस्त्रगृह.

मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकालपथावरील अपूर्ण कार्याबाबत ठेकेदारांवर नाराजी व्यक्त केली. मंदिरांच्या नावांच्या पाट्या, रस्त्यांचे सपाटीकरण ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

मंत्री महाजन यांनी परिसरातील इमारतींची स्थिती, भिंतींना पडलेल्या भेगा तसेच मंदिरांच्या कामासाठी वापरण्यात येणारा दगड आणि त्याची गुणवत्ता यावेळी तपासली.



