मनपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान*

*मनपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान*
नाशिक जन्मत माहिती अधिकार कायदे अंतर्गत येणाऱ्या पत्रांचा निपटारा वेळेत करून या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करावी असे व्याख्यानातून सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड मेदिनी कुलकर्णी यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यानिमित्त नाशिक मनपातील जन माहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन स्थायी समिती सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड मेदिनी कुलकर्णी यांनी माहिती अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना माहिती अधिकार कायद्यातील विविध तरतुदी व कलमांचा अभ्यास करून त्यानुसार आलेल्या पत्रांचा निपटारा करण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच यावेळी अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड मेदिनी कुलकर्णी यांचे स्वागत केले. या व्याख्यान कार्यक्रमास वित्त व लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरूट, उपायुक्त नितीन नेर, नितीन पवार, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे,डॉ.जितेंद्र धनेश्वर, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, नितीन धामणे, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विधी अधिकारी संजय शेळके, भावना कुवर आदींसह विधी विभागातील कर्मचारी प्रयत्नशील होते.
*विधी विभाग*
*दि.२९/०९/२०२६*
*मनपाच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त व्याख्यान*
माहिती अधिकार कायदे अंतर्गत येणाऱ्या पत्रांचा निपटारा वेळेत करून या कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करावी असे व्याख्यानातून सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड मेदिनी कुलकर्णी यांनी सांगितले.