ब्रेकिंग

तीन तास दरीत अडकलेल्या पिता पुत्रांची पांडवलेना दरीतून सुखरूप सुटका.

नाशिक जनमत- डोंगरावरून पिता-पुत्रांची सुखरूप सुट का

 

इंदिरानगर, ता. २७: रविवारी (ता. २७) नाशिकच्या पांडवलेणी या ठिकाणी अनेक पर्यटक सकाळी मॉर्निंग वॉक तसेच ट्रेक साठी जात असतात. काल सकाळी पांडवलेणीच्या डोंगरावर चुकीच्या बाजूने ट्रेकिंगसाठी गेलेल्या आणि अवघड ठिकाणी अडकून पडलेल्या अॅड. उमेश वालझाडे आणि त्यांचा मुलगा तेजस वालझाडे यांना इंदिरानगर पोलिस, सिडको अग्निशामक दल आणि नाशिक क्लाइंबर्स अॅन्ड रेस्क्यू असोसिएशनच्या सदस्यांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप खाली उतरविले.

तेजससोबत अॅड. वालझाडे पांडव लेणीला वळसा घालून विरुद्ध दिशेने डोंगरावर चढले. अत्यंत निसरड्या असलेल्या ठिकाणी ते अडकले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेजसने ११२ क्रमांकावर मदत मागितली. तातडीने इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी कर्मचारी सचिन पवार आणि दिनेश देवरे यांना तिकडे पाठवले. दरम्यान, सिडको अग्निशामक दलालादेखील माहिती मिळाल्याने केंद्रप्रमुख हर्षद पटेल, श्रीराम देशमुख, पार्थ शिंदे, सुमीत काठे, मल्हारी अहिरे येथे पोहोचले.

इंदिरा नगर पोलिस स्टेशनचे पवार हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलिस खात्यात भरती झाले असल्याने अग्निशामक दलासह तेथे पोचले.पोचल्यानंतर मात्र तेथील वाट आणि सगळा भाग बघून काय करावे, या चिंतेत ते पडले होते. होईल तितके अंतर त्यांनीत्यांच्यासोबत पार केले.

नाशिक क्लाइंबर्सचे अध्यक्ष दयानंद कोळी, नीलेश पवार, देवदत्त पवार, सागर धात्रक, शरद पवार दिनेश भडांगे ही टीम सर्व साहित्यासह वर पोचली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर वालझाडे यांना खाली उतरवण्यात यश आले.सहाय्यक निरीक्षक सुनील अंकोलीकरयांनी सर्वांचे अभिनंदन केले. दरम्यान, हा अत्यंत धोक्यात ट्रेक होता आणि वेळीच मदत झाल्याने मोठ्या संकटातून वाचल्याच्या भावना अॅड. वालझाडे यांनी व्यक्त केली.

या वेळी पोलिस कर्मचारी सचीन पवार यांनी सांगितले की 

अत्यंत अवघड आणि टोकदार ठिकाणी अॅड. वालझाडे अडकले होते. उन्हामुळे रेस्क्यू ऑपरेशनने सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. चुकीच्या दिशेने जाऊन जीव धोक्यात घालून या प्रकारचा ट्रेक हौशी पर्यटकांनी टाळला पाहिजे.

तसेच नाशिक क्लाइंबर्सचे अध्यक्ष दयानंद कोळी यांनी सांगितले की,

या ठिकाणी ट्रेकिंग करणे धोक्याचे आहे, असा फलक पोलिसांनी अथवा वन विभागाने लावणे गरजेचे आहे. रेस्क्यू करण्याची वेळ आल्यास संबंधितांकडून त्या बदल्यात सामाजिक कार्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल, असेही त्यावर नमूद केले पाहिजे. तरच हौशी पर्यटक या जीवघेण्या प्रकारापासून लांब राहतील.

सध्या मोठ्या प्रमाणात ऊन असल्याने पर्यटकांनी सकाळी 9 वाजेच्या आत ब्रेक व्यायाम करणे जरुरीचे झाले आहे. अति उन्हामुळे पाण्याची सोय नसल्याने पर्यटक या ठिकाणी आजारी पडू शकतात. दरम्यान पर्यटकांनी सुरक्षितता बाळा गावी असे नाशिक जनमत तर्फे  जनहितार्थ सांगण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे