शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करणार. सुहास आण्णा कांदे
शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करणार– आ. कांदे
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि.२० रोजी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मला तालुक्यातील जनतेने आमदार केले. हे माझ्याकडून कधीही न फिटनारे जनतेचे ऋण आहे, त्यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत तालुक्यातील जनतेची सेवा करणार असून मी स्वतःच्या डोक्यात केव्हाही आमदार म्हणून हवा जावू देणार नाही.
कोरोणाच्या काळात अनेक जण देवाघरी गेले, परंतु देवाने मला जनसेवेसाठी ठेवले याबद्दल देवाचे आभार मानतो. तसेच येथील श्री क्षेत्र पिनाकेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी पर्यावरण विकास योजनेअंतर्गत पाच कोटी मंजूर केले असून घाटमाथ्यावर शेतकर्यांच्या पांधी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे असे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर
तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असुन आपण केव्हाही हाक मारा मी हजर आहे. नागरिकांचे काही काम असल्यास नांदगाव येथील विश्रामगृह येथे भेटावे. माझी भेट झाली नाही तरी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित असतात त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या तरी आपले काम निश्चित होईल. मी जनतेच्या विस्वासाला तडा जावू देणार नाही, तालुक्यातील विकास कामांसाठी
मंत्री, अधिकारी यांच्या सोबत भांडलो.
युती असतांना मित्र पक्षाच्या उमेदवार केंद्रीय मंत्री खा.भारतीताई पवार यांना शिवसैनिकांनी घाटमाथ्यावरुन भरघोस मतदान केले होते. त्याच धरतीवर एप्रिल मे मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होणार आहे तरी पक्ष जो उमेदवार निश्चित करील त्या उमेदवारांना आपापसातील गट-तट बाजूला ठेवूननिवडून द्या मि आपल्या कामासाठी सेवक म्हणून बसलेलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आपल्या विस्वासाला तडा जावू देणार नाही. असे आवाहन त्यांनी केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष भाऊसाहेब सुर्यवंशी तसेच वसंतनगर येथील सुमारे १५ नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा आमदार कांदे यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आपण शिव सेनेत प्रवेश केला, याचा पश्चाताप होणार नाही, आ. कांदे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे हे होते. शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, सभापती तेज कवडे, मधुबाला खिरडकर, भाऊसाहेब हिरे, अनिल तात्या रिंढे, युवा सेनेचे गुलाब चव्हाण, बंडू पाटील, एकनाथ सदगीर, भाऊसाहेब सदागिर, दत्तू काळे श्रावण काळे नंदू खरात ,डॉ प्रकाश चव्हाण, कांतीलाल चव्हाण, संजय राठोड, भोपाल राठोड, काळू राठोड, संदीप पाटील, चंद्रकांत जाधव, आनंदराव सूर्यवंशी अदी मान्यवर उपस्थित होते.
तर भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश करताच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोफ डागत आमदार कसा असावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आ. सुहास आण्णा कांदे अशा शब्दात सुरुवात करत, भुजबळांच्या मागील १० वर्षे तुलनेत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अडिच वर्षात तालुक्यात विकास कामे केली असल्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन शिवसेनेत प्रवेश करत असुन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये १० वर्ष कामाची पावती मिळाली नाही. आ. सुहास आण्णा यांच्या विकास कामाची पध्दत पहाता मी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उशीर केला असे वाटते आहे. असे सुर्यवंशी म्हणाले तर येनार्या जि.प. पं.स. निवडणूकीत पक्ष देईल तो उमेदवार निवडून आनु असा शब्द दिला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक अनिल रिंढे म्हणाले की पक्षाची निशाणी पाहून मतदान करावे, आणि शिवसेनेशी एकनिष्ठ काम करावे, कार्यकर्त्यांनी ठरविले तर विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तेज कवडे यांनी
कोरोणाच्या काळात विकास मंदावला होता, आता पुन्हा झपाट्याने विकास कामे सुरू असून आपली साथ मिळणार असेल तर मि जिल्हा परिषदेची उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असे म्हणाले. गण प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आमदार सुहास आण्णा यांच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांच्या असून फक्त आमदार साहेब समोर आल्यानंतर मागेपुढे करून उपस्थिती दर्शवून नये असे ते काही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुलाब चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन गण प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले, तर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या यांचे आभार वंजारी समाजाचे नेते एन. के.राठोड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने जातेगाव गटातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते