नाशिक शहरातील व्यावसायिकांनी दुकानाच्या पाट्या मराठीत लावाव्यात इंग्रजी पाट्याना काळे फासत मनसे तर्फे आंदोलन.
-नाशिक शहरातील व्यावसायिकांनी दुकानाच्या पाट्या मराठीत लावाव्यात इंग्रजी पाट्याना काळे फासत मनसे तर्फे आंदोलन.
नाशिक जनमत. प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मराठी भाषेत बोर्ड लावण्याविषयी आंदोलन करण्यात आले. लवकरच निवडणुका लागण्याचे चिन्ह असून महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोला व दुकानावर मराठी भाषेत बोर्ड लावा असा आग्रह मनसे सैनिका तर्फे धरला जात आहे. याच धरतीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इंग्लिश नाव असणाऱ्या दुकानांच्या पाट्यावर काळे फासण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे,मनोज घोडके, नामदेव पाटील,अमित गांगुर्डे,संजय देवरे,मिलिंद कांबळे उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा,संतोष कोरडे, विजय आहेरे,अक्षय खांडरे,विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे,भाऊसाहेब निमसे, साहेबराव खर्जुन,धीरज भोसले, बंटी लबडे,नितीन माळी,प्रमोद साखरे,अतुल पाटील ,अर्जुन वेताळ,निकितेश धाकराव,निलेश शहाणे,देवचंद केदारे,विजय ठाकरे,निखिल सरपोदार,राकेश परदेशी,किरण सिरसागर,ज्ञानेश्वर बगडे,महिला सेना जिल्हाध्यक्ष ज्योतीताई शिंदे,शहराध्यक्ष आरतीताई खिराडकर, अरुणाताई पाटील, स्वागताताई उपासने,अक्षराताई घोडके,मीराताई आवारे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बापू पाटील,शहराध्यक्षा ललित वाघ,जिल्हा उपाध्यक्ष नितीन दानापुणे,विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष रोहन जगताप,जनहित विधी जिल्हाध्यक्ष प्रफुल बनबैरू, शहराध्यक्ष सौरभ खैरनार,नितीन पंडित,शाम गोहाड,संदेश जगताप शंकर कनकुसे,मनोज सोनवणे,गणेश जोमान,विशाल भावले,गोकुळ नागरे,भूषण शिरसाट,सचिन रोजेकर,मनोज सावंत,रोंनी पवार,अजिंक्य पारक,नितीन अहिरराव,अमोल निसळ,योगेश दाभाडे,साई गुंजाळ, अनिकेत निकम, किरण पवार,संदिप मालोकर व सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.