क्रिडा व मनोरंजन

बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी नाशिकच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व साक्षी कानडी यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.

 

 

बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी

 

नाशिकच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व साक्षी कानडी

यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

 

नाशिकच्या महिला क्रिकेटसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व साक्षी कानडी ह्या तीन खेळाडूंची महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे २३ वर्षांखालील महिलांसाठी टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या या तीन युवा महिला क्रिकेटपटूंची निवड झाली आहे.

ईश्वरी सावकार , रसिका शिंदे यांनी यापूर्वी देखील महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तेवीस व एकोणीस वर्षांखालील या विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. साक्षी कानडीनेही टी-ट्वेन्टी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे .

सदर महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने १० ते २१ डिसेंबर २०२३ दरम्यान त्रिवेंद्रम येथे खेळविले जाणार आहेत . महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : १० डिसेंबर- मणीपुर , ११ डिसेंबर- हिमाचल प्रदेश, १३ डिसेंबर – तामिळनाडू ,१५ डिसेंबर – सिक्कीम, १७ डिसेंबर – झारखंड, १९ डिसेंबर – विदर्भ , २१ डिसेंबर – नागालँड .

ईश्वरी , रसिका शिंदे व साक्षी यांच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व महिला संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तीन ही खेळाडूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.
[2/12, 4:41 PM] रकटे नगररचना नाशिक मनपा: ईश्वरी सावकार

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे