उपवनसंरक्षकाच्या घरातून – पाच लाख रोख, १० तोळे सोने जप्त
लाच घेणाऱ्या दोघे अधिकाऱ्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

लाचखोर उपवनसंरक्षकाच्या घरातून – पाच लाख रोख, १० तोळे सोने जप्त
गाडी सोडवण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना २१ पर्यंत पोलिस कोठडी
प्रतिनिध
नाशिक जन्मत
दोन दिवसांपूर्वी दहा हजार रुपयाची लाच घेणाऱ्या उपवनसंरक्षक व त्याच्या जोडीदाराला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे .
शेतातील जांभळाच्या व सादडाच्या जुन्या वाळलेल्या झाडांची लाकडे पेपर मिलमध्ये विकण्यासाठी नेणारी जीप वनविभागाच्या पथकाने जप्त केली असता ती सोडविण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी उपवनसंरक्षक अधिकारी शिरीषकुमार निरभवणे व वनपाल सुरेश चौधरी यांना न्यायालयात हजर केले असता २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वर्ग-१ अधिकारी असलेल्या निरभवणे यांच्या अहिल्यानगर येथील
निवास्थानी पथकाने रात्री झडती घेतली असता त्याच्या घरात सुमारे पाच लाखांची रोकड व १० तोळे सोन्याचे दागिने व काही मालमत्तांचे दस्तावेज पथकाच्या हाती लागले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एकनाथ पाटील, सुनील पवार यांच्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरा हा सापळा यशस्वी केला. वनविभागात क्लासवन असलेल्या व १ लाख १० हजाराचे वेतन घेणाऱ्या उप वनसंरक्षक शिरीषकुमार सजन निरभवणे (५४) व वनपाल सुरेश कारभारी चौधरी या दोघांविरोधात वाडीव-हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांनां मंगळवारी अटक करण्यात आली होती. या प्रकाराने वनविभागातील भरारी पथकातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.