एक नंबरने मंत्री छगन भुजबळ निवडून येणार; विंचूरच्या सभेत ग्रामस्थांचा निर्धार*
*एक नंबरने मंत्री छगन भुजबळ निवडून येणार; विंचूरच्या सभेत ग्रामस्थांचा निर्धार*
*लाडकी बहिण योजना कदापीही बंद होणार नाही-मंत्री छगन भुजबळ*
*महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी महायुतीच्या पाठीशी राहा – छगन भुजबळ*
*येवला,निफाड,विंचूर,दि.१५ नोव्हेंबर :-*राज्यातील २ कोटी ७० लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे. ही योजना कदापीही बंद होणार नाही. उलट या योजनेच्या रकमेत वाढ करून २१०० रुपये प्रति महिना देण्यात येईल. या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी महायुतीच्या पाठीशी राहा असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना शिंदे गट,आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज विंचूर येथे भव्य जाहीर सभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकरमाजी आमदार जयंत जाधव,तात्यासाहेब लहरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,पंढरीनाथ थोरे,मायावती पगारे,डी.के.जगताप,माजी सभापती सुवर्णाताई जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, शेखर होळकर,येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, एल.जी.कदम, रामनाथ शेजवळ, दत्तात्रय डुकरे, बालेश जाधव, भाजप तालुकाध्यक्ष निलेश सालकाडे,मच्छिंद्र थोरात, शिवाजी सुपनर,कैलास सोनवणे, विंचुरचे सरपंच सचिन दरेकर, विलास गोरे, अशोक नागरे, सुरेखा नागरे, डॉ.वैशाली पवार, भाऊसाहेब बोचरे, किशोर जेऊघाले, गोविंद हिरे, अविनाश सालगुडे, संतोष राजोळे, मधुकर गायकर, माधव जगताप, पांडुरंग राऊत, जयंत साळी, महेंद्र पुंड, सोहेल मोमीन, उत्तम नागेरे, योगेश भोसले, रौफ मुलानी, शांताराम दराडे, बाळसाहेब पुंड, संपत डुंबरे, रामभाऊ जगताप, बाळकृष्ण दराडे याच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्य व कांदा निर्यात शुल्क कमी केल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम द्यावी लागत होती. मात्र, आता तर राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.निफाड तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोयाबीन, बाजरी, कापूस, कांदा, मका, मुग या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी कोट्यावधी रुपयाचा पीकविमा वाटप करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महायुती सरकार राज्यात अतिशय वेगाने काम करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाला थारा न देता सर्वांनी एकत्र राहून महाराष्ट्र मजबूत करायला हवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
ही निवडणूक विकासाची आहे. त्यामुळे कुठल्याही भूलथापाना बळी न पडता मंत्री छगन भुजबळ म्हणजेच विकासाला मतदान करावे असे आवाहन माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी केले.
आपल्या मतदारसंघाचे आमदार हे मंत्री पदावर राहिल्याने आपल्याला विकासाची अनेक कामे होऊ शकली आहे. येवल्याच्या विकासाठी मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा मंत्री म्हणून आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून विकासाची अधिक कामे करतील त्यामुळे त्यांना एक नंबरने निवडून द्या असे आवाहन प्रचार प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांनी केले.
महाराष्ट्रात सर्वाधिक निधी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदार संघाला मिळाला आहे. महायुती सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी मतदारसंघात करण्यात आली आहे.शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यासह अनेक महत्वपूर्ण विकास कामे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. वीज बिल माफीचा महत्वपूर्ण निर्णय युती सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळाला आहे. राज्यात महायुती सरकार नक्कीच येणार असून येवल्याच्या विकासाठी मंत्री छगन भुजबळ यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
आपल्याला मतदारसंघात आमदार नको तर येवल्याच्या विकासासाठी नामदार हवा आहे. ज्यांना विकास दिसत नसेल तर त्यांना चष्मा घेऊन द्या अशी टीका ज्येष्ठ नेते एल.जी.कदम यांनी केले.