ब्रेकिंग

दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सिडकोत उत्साहात साजरा*”

” *दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन सिडकोत उत्साहात साजरा*”

3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने , प्रभोधनकार ठाकरे सभागृह, सिडको नाशिक येथे दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती, चित्रा ताई वाघ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, चित्राताई वाघ यांनी सर्व योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आमदार सौ सिमा ताई हिरे यांनी घुगे दांपत्य दिव्यांग असूनही दिव्यांग बांधण्यासाठी करत असलेल्या कार्याची श्रुती केले बाळासाहेब हे जरी दिव्यांग असले तरी त्यांचे कार्य चांगल्या माणसाला लाजवेल असे आहे जयंती पुण्यतिथी दिवाळी फराळ वाटप असे सर्व कार्यक्रम घेत असतात गिरीश पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व व्यक्त केले व आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या, भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात थेट दिव्यांग बांधवांजवळ जाऊन दिव्यांग बांधवांना थंडीपासून सरंक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेट ( कांबळे ) वाटण्यात आले, नंतर सर्व दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटण्यात आले, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना या घोषणेने सर्व दिव्यांग बांधव आनंदित झालेले होते, लाडु वाटत करून आनंद साजरा करण्यात प्रास्ताविक बाळासाहेब यांनी म्हटले की दिव्याग मंत्रालय दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आभार मानले व नाशिक महानगरपालिकेने 3000हजार मानधन दिल्याबद्दल आभार मानले अपंग व्यक्तींना अपंग न बोलता दिव्यांग बोलावे या पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या निर्णयाचे स्वागतही करण्यात आले, कार्यक्रमात एका दिव्यांग बांधवांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला, अंध असूनही बाज विणण्याचे काम अंध आजोबा करतात व तरुण पिढीला मार्गदर्शनही करतात त्यांचा सत्कार करण्यात आला, बाळासाहेब घुगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, सिन्नर येथील लेखक कवी वृक्षमित्र विष्णू वाघ यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला देवाने कोणती ना कोणती दैवी शक्ती दिलेली होती, कोणी गायन उत्कृष्ट करत होते तर काही दिव्यांग असून पण समाजासाठी काही तरी केले पाहिजे ही भावना मनात ठेवून तन मन धनाने काम करत होते, दिव्यांग नसणाऱ्या व्यक्तींनी दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना आधार द्यावा अस काही वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ होत्या, कार्यक्रमाला आमदार सौ सिमा ताई हिरे, शहर अध्यक्ष गिरीश भाऊ पालवे, सरचिटणीस जगन आण्णा पाटील, रेशमी ताई बेंडाळे, रोहिणी नायडू, मंजुषाताई दराडे, नगरसेविका छाया ताई देवांग, कावेरी घुगे, भारती ताई कराड, विमल आव्हाड, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर, जानवी बिरारी, के के सानप, मंडल अध्यक्ष शिवाजी नाना बरके, उतम पिंटू काळे , सरचिटणीस यशवंत नेरकर, रवी पाटील, प्रकाश चकोर, विलास सानप सर , राजेंद्र जडे ,करण शिंदे ,दिलीप देवांग दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष विनायक कस्तुरे सचिन अग्रवाल बुरान शेख गोटीराम सूर्यवंशी युवराज जाधव रंगनाथ दरगुडे सुनील सोनवणे व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे , यमुनाताई घुगे व बालसमाजसेवक सार्थक घुगे यांनी उत्कृष्टपणे केले तर सूत्रसंचालन डी बी राजपूत यांनी केले, कार्यक्रमाचे आभार यमुना ताई बाळासाहेब घुगे यांनी मानले.”

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे