आपले जीवन सुखी संपन्न व आनंदी कसे जगावे याचे शिक्षण शिव दर्शन सरोवर मधून मिळणार- ब्रह्माकुमारी संतोष दादीजी

आपले जीवन सुखी संपन्न व आनंदी कसे जगावे याचे शिक्षण शिव दर्शन सरोवर मधून मिळणार- ब्रह्माकुमारी संतोष दादीजी
त्रंबकेश्वर येथे ब्रह्माकुमारीच्या वतीने अध्यात्मिक संग्रहालय भूमिपूजन सोहळा संपन्न
नाशिक: प्रतिनिधी
आजचा मनुष्य खूप दुःखी व अशांत आहे त्याला शांतीची खूप तहान लागलेली आहे त्याचीही तहान स्वयं निराकार शिव परमात्माच भागवू शकतो. सांगताना आनंद वाटतो की स्वयं परमात्मा या सृष्टीला देवभूमी बनवत आहेत या देवभूमीमध्ये, दैवी संस्कृतीमध्ये जाण्यासाठी काय तयारी करावी याचे ज्ञान या शिवदर्शन सरोवर मधून सर्वांना प्राप्त होणार आहे. भविष्यातच काय परंतु आजच्या वर्तमान स्थितीतही आपले जीवन सुखी संपन्न व आनंदी कसे जगावे याचे शिक्षण या नवीन वास्तू मधून मिळणार आहे. असा शुभ आशीर्वाद आंतरराष्ट्रीय संस्था ब्रह्माकुमारीज च्या संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांनी व्यक्त केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे त्रंबकेश्वर येथे सहा एकर जागेत भव्य आध्यात्मिक संग्रहलयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वास्तूचा भूमिपूजन सोहळा दिनांक २४ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या जागतिक स्तरावरील संयुक्त संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दादीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शहरातील गणमान्य लोकांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने माजी महापौर दशरथ पाटील, स्वामी शंकरानंद सरस्वती- आनंद आखाडा, स्वामी श्रीकंठानंद जी महाराज अध्यक्ष श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थान, वसंत व्याख्यानमाले चे अध्यक्ष श्रीकांत बेनी, विकसक विलास पडवळ, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,राष्ट्रीय पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तुषार जाधव, अर्किटेक किशोर शिंदे व कपिल नारंग, गोकुळ पाटील, पुरोहित प्रशांत गायधनी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत संबोधनात नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी स्पष्ट केले की येत्या कुंभमेळा अर्थात २०२७ पर्यंत या वास्तूचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात येईल व येथे येणारे पर्यटक व भक्तगणांना ईश्वरीय संदेश प्राप्त होईल या दृष्टीने या वास्तूची जलद गतीने निर्मिती करण्यात येणार आहे.
माजी महापौर दशरथ पाटील यांनी ब्रह्माकुमारीच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. गतकाळातील कुंभमेळ्याची यशस्वी कारकीर्द सांगत याही वेळेस येणारा कुंभमेळा हा ब्रह्माकुमारी संस्थेच्या या नवीन उपक्रमाने अधिकच संस्मरणीय ठरेल असे भाव व्यक्त केले.
श्रीकंठानंद महाराज यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की आज काळ बदलत आहे सत्ययुगाची पार्श्वभूमी तयार होत आहे. शिवदर्शन सरोवर हे नाव सुद्धा अतिशय मार्मिक आहे जोपर्यंत शिवाचे दर्शन होत नाही तोपर्यंत जीवन पूर्ण होऊ शकणार नाही. ब्रह्मा कुमारी संस्थेच्या सान्निध्यात येऊन खूप आनंद होतो, येथे मला आपुलकीची भावना येते असे प्रतिपादन कंठानंद महाराज यांनी याप्रसंगी केले.
महंत प्रेम पुरी महाराज , श्रीकांत बेन, पुरोहित संघ चे प्रशांत गायधनी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर,
त्रिवेणी तुंगार माजी नगर अध्यक्ष, त्रंबकेश्वर संस्थान माजी विश्वस्त संतोष कदम आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आलेल्या पाहुण्यांचे दीदींच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ब्रह्माकुमार ओंकार यांनी भाव गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिवस्मृती अष्टकं गान रागिणी सिंग यांनी तर नृत्य द्वारे स्वागत ऋतुजा यांनी केले.
संजय ग्रुप ने शिव तांडव नृत्य करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
सूत्र संचालन ब्रह्माकुमारी सरला दीदी यांनी केले.
याप्रसंगी ब्रह्माकुमारी शक्ती दीदी, ब्रह्माकुमारी वीणा दीदी,
ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी मीरा दीदी, ब्रह्माकुमारी विणु दीदी ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी मंगल दीदी, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ब्रह्माकुमारी निता दीदी, ब्रह्माकुमारी मनीषा दीदी ब्रह्माकुमारी पूनम दीदी,ब्रह्माकुमारी आरती दीदी, ब्रह्माकुमारी शीतल दीदी
आदी समर्पित भगिनी व नाशिक जिल्ह्यातून ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ब्रह्मा भोजन ने झाली.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एकर जागेवर साकारण्यात येणारे हे भव्य आध्यात्मिक संग्रहालय महाराष्ट्रातील एक प्रेक्षणीय स्थळ असेल. ब्रह्माकुमरिज मुख्यालय माउंट आबू येथील ज्ञान सरोवर संकुलात बांधण्यात आलेल्या आर्ट गॅलरीचा अनुभव घेऊन या संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये परमात्म्याचा परिचय, सृष्टीच्या आदी मध्य अंताची माहिती, ४ युगांचे ज्ञान, संगम युगातील परमात्म अवतरणाचा संदेश अशा अनेक बाबी विविध कलात्मक शिल्प, देखावे व चित्रकलेतून साकारण्यात येणार आहे. आत्म अनुभूतीसाठी येथे अनुभूती कक्ष व राजयोग ध्यान कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. येथे आमंत्रित लोकांसाठी सेमिनार हॉल द्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर, राजयोग शिबिर व्यसनमुक्ती शिबिर, तणाव मुक्ती शिबिर असे अनेक कार्यक्रमांद्वारे लाखो लोकांना याचा लाभ मिळणार आहे. या अलौकिक आध्यात्मिक संग्राहलयाचा लाभ नाशिककरांनाच नव्हे तर देश विदेशातून त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व भक्तांना सुद्धा होणार आहे. आबाल वृद्धांसाठी येथे कलात्मक गार्डन तसेच फन अँड जॉय पार्कची सुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भक्त व पर्यटकांसाठी हे एक मरूस्थल असेल असा विश्वास येथील मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केला आहे.