ब्रेकिंग

सुधाकर बडगुजर यांची उबा ठा गटातून पक्षविरोधी कामे केल्याने हकालपट्टी.

नाशिक जन्मत  चंद्रकांत धात्रक यांच्याकडून. दोन दिवस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे नाशिक दौऱ्यावर होते. याच वेळेस उबाठा गटाचे  सुधाकर राव बडगुजर हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर भाजपा तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ही भेट चर्चेचा विषय ठरली. अनेक तर्क वर्क राजकीय क्षेत्रातून काढले जात होते.

 

सुधाकर बडगुजर हे भाजप पक्षात जाणार असे सांगण्यात येत होते. तसेच गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री यांनी देखील सांगितले होते की येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

 

 

 

याच विषयावर आज पत्रकार परिषद चालू असताना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संजय राऊत यांच्या फोनवरून  सुधाकरराव बडगुजर यांनी पक्षविरोधी कामे केल्याने त्यांची पक्षातून हक्कलपट्टी झाल्याचे फोन द्वारे वृत्त आल्याचे दत्ताजी गायकवाड यांनी सांगितले. सुधाकर बडगुजर हे कोणत्या पक्षात जाता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे  दरम्यान दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा पक्षावर विविध आरोप करणारे सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झाला तर भाजपा पक्ष अंतर्गत  नाशिक शहरात कार्यकर्ते व आमदारांमध्ये नाराजीचा सूर असा चर्चा रंगल्या आहेत.

सुधाकर भाऊ बडगुजर हे आपल्याबरोबर किती कार्यकर्ते व नगरसेवकांना बरोबर नेता याकडे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या कुंभमेळ्याच्या काळामध्ये विविध टेंडर कंत्राट तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा विषयी असलेले चांगले वातावरण भक्ता सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर मोठ्या समूह भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील आहे

राजकारणात काही होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण होऊ शकते.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे