लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी प्रदेशाध्यक्ष. एकनाथराव ढाकणे.

नाशिक जनमत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांची प्रतिपादन राष्ट्रीय जयंती उत्सव समिती वंजारी समाज तथा वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 3 जून 2025 रोजी सकाळी नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील गोपीनाथ गडाला भेट देऊन त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या स्मृति स्थळाला अभिवादन केले व त्यांचे विचार समाजासाठी आणि बहुजन घटकासाठी अतिशय प्रेरणादायी असून वंजारी समाज पुढे जाण्यामध्ये मुंडे साहेबांचे खूप मोठे योगदान आहे त्यांचे विचार आणि त्यांचे अधुरी स्वप्न आपण पुढे नेणे हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असे उद्गार प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे साहेब यांनी अभिवादन सभेत विचार व्यक्त केले तसेच या ठिकाणी राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ तुकाराम सांगळे राष्ट्रीय सचिव शामराव गीते राष्ट्रीय कोषाध्यक्ष
मीराताई सानप प्रदेश प्रवक्ता सुरेश सांगळे व उपाध्यक्ष रामनाथ सांगळे निवृत्ती किसन शेळके सचिव तालुका सिन्नर सरपंच नांदूर शिंगोटे श्री दीपक बरके भारत दराडे राजेंद्र दराडे उपसरपंच आनंदराव शेळके रामनाथ सांगळे अजून सुरेश सांगळे रावसाहेब कांगणे बाळासाहेब घुगे सुदाम भाबड कैलास बर्गे लहू पठारे नागेश शेळके सह आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते प्रथमता स्मृतीस्थळाला अभिवादन करून समाजाच्या वतीने हार डॉक्टर अर्पण केले याप्रसंगी तुकाराम सांगळे यांनी प्रस्ताविक करून समितीची आणि कामकाजाची भूमिका विशद केली डॉएकनाथराव ढाकणे प्रदेश अध्यक्ष यांनी आजच्या दिनी संकल्प करूया आणि राष्ट्रसंत भगवान बाबा ची जयंती आणि पुण्यतिथी शासनाने साजरी करावी आग्रही भूमिका मांडली त्याचबरोबर समाजाने यापुढे लग्न समारंभ साध्या पद्धतीने सादरी करावे त हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा समजण्यात यावा अशी आचारसहिता समाजाने ठरवलेली आहे याची माहिती दिली तसेच आरक्षण जे काही समाजासाठी लागू आहे त्यामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे समाज पुढारलेला आहे त्यामध्ये मुंडे साहेबांचे अनन्यसाधारण योगदान आहे त्यांच्या कार्यास
अभिवादन केले याप्रसंगी याप्रसंगी रावसाहेब कांगणे समिती प्रदेश संघटक यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला त्याचबरोबर नियुक्तीपत्र सरपंच नांदूर शिंगोटे बाळासाहेब घुगे सुरेशराव सांगळे रामनाथ पाटील सांगळे यांना समितीच्या वतीने नियुक्तीपत्र प्रदान केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शामराव गीते यांनी मानले