10 टवाळांची तिघांना मारहाण; कारच्या काचा फोडल्या जेलरोड ची घटना.
टवाळांची तिघांना मारहाण; कारच्या काचा फोडल्या नाशिक जन्मत नासिकरण साठी वाढती गुन्हेगारी डोके दुखी ठरत आहे. दररोज गाड्या फोडणे खून मारामाऱ्या घरपोडी इत्यादी घटना घडत आहे. काल जेलरोडच्य
साईनाथनगर, ढिकलेनगर येथे जेवण झाल्यानंतर घराबाहेर दोघे मित्र बोलत होते. यावेळी चार दुचाकीवरून ट्रिपलसीट आलेल्या टवाळांनी विनाकारण शिवीगाळ करीत ‘तुमच्या बापाचा रस्ता आहे का’ असे म्हणत मारहाण केली. कोयत्याने कारच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि फिर्यादी सिद्धार्थ जगताप (३६ रा. ढिकलेनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री साडेआठ वाजता सिद्धार्थ, साहील खरात, मंगेश उतपुरे यांच्यासोबत कार पार्क करण्यावरून बोलत होते. तेव्हाच ९ ते १० टवाळखोर हे चार दुचाकीवरून सिद्धार्थजवळ येऊन रस्ता तुमच्या बापाचा आहे का असे बोलून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच कारच्या काचा फोडल्या