आरोग्य व शिक्षण

ज्ञान,कर्म व भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे यशस्वी जीवन    डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे ; मांजरगाव येथे रोप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह प्रारंभ .

ज्ञान,कर्म व भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे यशस्वी जीवन

 

डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे ; मांजरगाव येथे रोप्य महोत्सवी हरिनाम सप्ताह प्रारंभ

 

नाशिक : प्रतिनिधी

जीवन जगत असताना ज्ञान, कर्म व भक्ती या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. या बाबी जीवनात आल्या तर माणसाचे जीवन समृध्द झाल्याशिवाय राहत नाही.ज्ञान व भक्ती असून चालत नाही त्यासाठी कर्माची ही आवश्यकता असते. परत ईश्वर प्राप्ती होत असते असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक,स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले.

निफाड तालुक्यातील मांजरगाव येथे श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे,माजी चेअरमन भास्करराव सोनवणे, सरपंच वंदना सुनील सोनवणे, उपसरपंच अनिता संदीप सानप, राधाकिसन हाडपे किसनराव सोनवणे, दगू नागरे , गणपत हाडपे , सोमनाथ चिंधू सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे डॉ.गुट्टे महाराज म्हणाले की, कर्म कसे असावे? त्याची फळे व परिणाम याविषयी अभंगाद्वारे माहिती दिली. वारकरी सांप्रदायाचे तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्व विशद करत मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे महत्त्व सांगितले. वेद,उपनिषदविषयी विविध दाखले देत माहिती दिली. “बृहुत सुकृताची जोडी” चांगले कर्म करा नुसता पैसा असून चालत नाही चांगल्या कर्माची आवश्यकता असते. राग,द्वेष मत्सर तिरस्कार यातून तात्पुरता आनंद भेटतो. परंतु जेव्हा दुःख किंवा आजारी पडतो त्यावेळेस होणाऱ्या वेदना महाभयंकर असतात चांगले कर्म करावे असे आवाहनही डॉ गुट्टे महाराज यांनी केले.

[यावेळी मृदुंगाचार्य हभप दिनेश महाराज मोजाड,गायनाचार्य ह भ प चिंतामण महाराज सानप , कुंदन महाराज बोरसे, कोमल महाराज गुर्जर, राहुल महाराज डुंबरे व त्यांचे वात्सल्य वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मंच यांनी उत्तम अशी संगीत साथ दिली.

महाराजांचे स्वागत उपसरपंच संदीप सानप यांनी केले व महाप्रसाद लक्ष्मण सानप यांच्यातर्फे होता.

कार्यक्रमास एकनाथ नागरे, पंडित सोनवणे , लक्ष्मण सोनवणे, चेअरमन सोमनाथ सोनवणे , व्हा.चेअरमन मीराबाई तुकाराम सोनवणे,सुभाष नागरे, शांताराम बोडके , विठोबा बोंद्रे, सागर दौंड आदींसह मांजरगाव, भुसे ,म्हाळसाकोरे , करंजगाव , तारूखेडले, चापडगाव, खानगाव थडी, येथील भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे