ब्रेकिंग

जागतिक सायकल दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य दिव्य सायकल रॅली. तरुणांनी घेतला भाग.

*

 

 

 

नाशिक जन्मत      जागतिक सायकल दिनानिमित्त आज हिरो सायकल्स, सायकल हब व रॉयल रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. 85 रायडर्स ने या राईडमध्ये सहभाग घेतला.

 सेवाकुंज, पंचवटी येथे राष्ट्रगीत झाल्यानंतर सकाळी 6.30 वा बाळासाहेब भापकर, सुरेश पाळदे, त्रिलोकनाथ अग्रवाल, कैलास बोरावके यांच्या हस्ते ध्वज दाखवून राईडला सुरुवात झाली. गणेशवाडी, मेनरोड, शालिमार, सीबीएस, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गे पुन्हा सायकल हब येथे राइडची सांगता झाली. सर्वांना अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व सहभागी रायडर्स ला आकर्षक टी शर्ट देण्यात आले.

    एरव्ही नाशिक शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ व प्रदूषणयुक्त वातावरणात जिथे चालणे मुश्किल होते अशा शहरी भागातून सायकलिंग करण्याचा आनंद अनुभवत रायडर मार्गस्थ होत होते. शहरवासीय सुद्धा या रांगेत शिस्तबद्ध चालणाऱ्या रायडर्स कडे कुतूहलाने बघत होते.

पंढरपूर वारी जाणाऱ्या रायडर्स करिता सायकल हब यांचे वतीने सर्व्हिसिंग व इतर खरेदीसाठी सवलतीची घोषणा करण्यात आली.

      राईड यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हिरो सायकल्सचे अधिकारी श्री रामशारण साहेब, सायकल हब चे सचिन मोरे व त्यांचे सर्व सहकारी, पंचवटी कॉलेज चे माजी प्राचार्य हरीश आडके सर व त्यांचे सहकारी आणि रॉयल रायडर्स चे रायडर प्रयत्नशील होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे