कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांना आता वन विभागाच्या व पोलीस कारवाईला जावे लागणार समोर.
प्रतिनिधी | नाशिक
दुगारवाडी धबधब्यावर रविवारी (दि.) (७) मुसळधार पावसात अडकलेल्या २७ हून अधिक पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी एका पर्यटकाचा पाण्यात वाहून गेल्याने कार मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण पोलिस व वनविभागाचे सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले शनिवारपासून सलग चार सुट्ट्या आणि तिसरा श्रावणी सोमवार येत असल्याने त्र्यंबकेश्वर व दुगारवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस तसेच वनखात्याच्या अधिकाऱ्यांशीही दिल्या आहेत.
बंदोबस्तात ३५० पोलिसांची जादा कुमक
दुगारवाडी, त्र्यंबकेश्वरला पर्यटकांची नोंदणी ठेवण्याचे आणि पाण्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी वनविभागाला ‘सूचना देण्यात आल्या आहेत. तिसरा श्रावणी सोमवार व सलग सुट्या लक्षात घेता अतिरिक्त ३५० अधिकारी यांचा क** बंदोबस्त राहणार आहे.
दुगारवाडी घटनेनंतर आता पोलिस नेत्र अन् वनविभागाची संयुक्त कारवाई¤
वनविभागाला पोलिसांनी सुचविले उपाय
धबधबा परिसरात पावसाच्या वेळी प्रवेश बंद ठेवावा. • प्रवेशद्वारावरच नोंदीसाठी सुरक्षारक्षक तात्काळ नेमावा.
•• न ऐकणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करा. • अंजनेरीपासूनच टप्प्याटप्याने नाका पद्धतीने तपासणी संयुक्तपणे कारवाईबाबत सूचना हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर. असणार .जोरदार पाऊस चालू असताना जीव धोक्यात घालून धबधब्याजवळ जाऊ नये. आपली काळजी घ्यावी. पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा परंतु आपल्या जीवाची काळजी घ्यावी.