ब्रेकिंग

नासिक महानगरपालिकेत आरोग्य वैद्यकीय उप सभापती पदी सतीश आनंदराव निकम.

 

नाशिक जनमत   नाशिक महानगरपालिकेच्या ३ विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

नाशिक महानगरपालिकेच्या शहर सुधार समिती,विधी समिती व वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती या ३ समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती सभागृहात पार पडल्या.

नाशिक महानगरपालिकेच्या शहर सुधार समितीच्या

सभापती पदासाठी जागृती दत्तू गांगुर्डे व उपसभापती पदासाठी जयंत अशोक जाचक तसेच विधी समितीच्या सभापती पदासाठी जुई प्रणव शिंदे तर उपसभापती पदासाठी अंकिता महेंद्र शिंदे त्याच प्रमाणे वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या

सभापती पदासाठी डॉ.पुनम योगेश महाले तर

उपसभापती पदासाठी सतीश आनंदराव निकम यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांनी केली. तिन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला.

नवनियुक्त शहर सुधार समितीच्या सभापती जागृती दत्तू गांगुर्डे व उपसभापती जयंत अशोक जाचक तसेच विधी समितीच्या सभापती जुई प्रणव शिंदे तर उपसभापती अंकिता महेंद्र शिंदे त्याच बरोबर वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीच्या सभापती डॉ. पुनम योगेश महाले तर उपसभापती सतीश आनंदराव निकम यांचे सत्कार मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी केले. त्यात उपमहापौर विलास शिंदे, गटनेते शाम बडोदे,अजय बोरस्ते,सीमा ठाकरे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी केले.

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे