ब्रेकिंग

महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू व श्रृंगेरी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजींच्या उपस्थितीत ६५०० जनजातीय बांधवांची महाआरती.

रामतीर्थ गोदावरी सेवासमितीचे शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांना निमंत्रण; समरसतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे स्वागत.

महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू व श्रृंगेरी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजींच्या उपस्थितीत ६५०० जनजातीय बांधवांची महाआरती

 

रामतीर्थ गोदावरी सेवासमितीचे शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांना निमंत्रण; समरसतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे स्वागत

 

नाशिक जन्मत  , दि. ४ ऑक्टोबर २०२६ :

दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिकच्या गोदातीरी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य महाआरतीसाठी शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी भेट घेऊन आग्रहाचे निमंत्रण दिले. या विशेष महाआरतीस भारताच्या महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचीही उपस्थिती राहणार आहे.

 

दि. ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सायंकाळी गोदातीरी ही विशेष महाआरती संपन्न होणार असून, त्यामध्ये ६५०० जनजातीय बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

 

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमामागील संकल्पना, त्यामागील सामाजिक भावना तसेच समरसतेचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न याबाबत जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांना सविस्तर माहिती दिली.

 

या उपक्रमामागील भावना आणि व्यापक सामाजिक उद्देश जाणून घेतल्यानंतर जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजींनी या उपक्रमाचे स्वागत केले कारण शृंगेरी पिठाचा सर्वात मोठा उद्देश हा धर्म रक्षण असून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पण त्याच उद्देशाने कार्य करत आहे आणि या महाआरतीचे निमंत्रण त्यांनी आनंदाने स्वीकारले. जेव्हा समितीने जगद्गुरु शंकराचार्यांना गोदावरी आरती ची स्मरणिका समर्पित केली तेव्हा ती स्मरणिका पाहून शंकराचार्यांनी समिती बद्दल गौरव उद्गार काढताना म्हणाले जे कार्य दक्षिणाम्नाय शृंगेरी पिठाचे आहे त्याच कार्याचे प्रतिबिंब या समितीच्या उपक्रमांमध्ये मला दिसत आहे, व रामतीर्थ गोदावरीच्या सर्व सेवा कार्याला त्यांनी हार्दिक शुभेच्छा आपला आशीर्वाद आणि पाठिंबा जाहीर केला.या माध्यमातून समाजात समरसता आणि बंधुभावाचा संदेश प्रभावीपणे पोहोचेल, याबाबत त्यांनी जाणून घेतले.

महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी आणि शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणाऱ्या या महाआरतीमुळे नाशिकच्या गोदातीरी सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देशभर पोहोचणार आहे, अशी भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 

 

या प्रसंगी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, उपाध्यक्ष नरसिंह कृपादास, पंडित शांताराम भानोसे, शैलेश देवी, शिवाजीदादा बोंदारडे, प्रफुल्ल संचेती, विनीत पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे