ब्रेकिंग

मोखाड्याने मला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला श्रद्धा शृंगारपुरे यांना डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार प्रदान

मोखाड्याने मला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला
श्रद्धा शृंगारपुरे यांना डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार प्रदान
नाशिक जन्मत : प्रतिनिधी
“मोखाड्याने मला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. गरिबी म्हणजे संसाधनांचा अभाव नव्हे, तर संधी, अनुभव, पर्याय आणि माहितीचा अभाव असतो. मात्र, आपण अनेकदा या परिस्थितीला दैव म्हणून स्वीकारतो. केवळ वस्तू वाटून किंवा दान करून आयुष्य बदलत नाही; तर ज्ञान, संधी आणि तंत्रज्ञानाची जोड देऊनच परिस्थितीत परिवर्तन घडविता येते,” असे प्रतिपादन मोखाड्यात सेवाकार्य करणाऱ्या श्रद्धा शृंगारपुरे यांनी केले.
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार २०२६ श्रद्धा शृंगारपुरे यांना प्रदान करण्यात आला. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या सोहळ्यात पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नीलिमाताई पवार यांच्या हस्ते शृंगारपुरे यांचा गौरव करण्यात आला.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा व परिसरातील अतिदुर्गम भागात स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून शृंगारपुरे सेवाकार्य करीत आहेत. ग्रामीण व वंचित घटकांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांत त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक विश्वस्त डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त २०१२ पासून हा पुरस्कार शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला दिला जातो.
मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आला.. पुरस्कार सोहळ्यास शकुंतला वाघ, डॉ. प्राची पवार, रविंद्र मनियार, रंजना पाटील, डॉ. ओमप्रकाश कुळकर्णी, नारायण थेटे आदी उपस्थित होते.
शृंगारपुरे पुढे म्हणाल्या की हा पुरस्कार स्व.डॉ वसंतराव पावर यांच्या नावाने मिळाला असल्याने याला खूप महत्व आहे. या पुरस्कारामुळे माला नवी ओळख मिळाली आहे.
यंदाचा पुरस्कार समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शृंगारपुरे यांना दिल्याचे खूप समाधान आहे. निवड समितीने चांगली निवड केली. यामुळे वंचित घाटकासाठी काम करणाऱ्या संस्थांनानिश्चित प्रेरणा मिळेल. असे नीलिमाताई पवार म्हणाल्या.
माणपत्र वाचन वसंतरावं खैरनार यांनी केले.प्रा. आंधळे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रावसाहेब थोरात सभागृहात गर्दी केली होती

: डॉ. प्राची पवार. अमृता पवार प्रणव पवार इत्यादी मान्यवर पुरस्कार उपस्थित होते श्रद्धा शृंगार पुरे यांनी आपल्या वयाच्या दहा वर्षापासून चा संघर्ष आठवणी आदिवासी भागातील समस्या व जिद्द इत्यादी महत्वपूर्ण इतिहास नागरिकांपुढे मांडला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे