नाशिक महानगरपालिकेच्या ५ विशेष समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी नगरसचिव संजय नेरकर यांच्याकडे अर्ज सादर झाले.

नाशिक महानगरपालिकेच्या ५ विशेष समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी नगरसचिव संजय नेरकर यांच्याकडे अर्ज सादर झाले.
नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, शहर सुधार समिती, वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य समिती, विधी समिती, शिक्षण समिती या ५ समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक ८ व ९ ऑक्टोबर रोजी मा.विभागीय आयुक्त सो.यांचे प्रतिनिधी मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पिठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत. त्या समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज स्वीकृती करण्यात आली. 
*१)महिला व बालकल्याण समिती*
सभापती -कोमल प्रताप मेहरोलीया
उपसभापती -चित्रा जगन्नाथ तांदळे
*२)शहर सुधार समिती*
सभापती -जागृती दत्तू गांगुर्डे
उपसभापती -जयंत अशोक जाचक
*३)वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य समिती*
सभापती -पुनम योगेश महाले
उपसभापती -सतीश आनंदराव निकम
*४)विधी समिती -*

सभापती -जुई प्रणव शिंदे
उपसभापती -अंकिता महेंद्र शिंदे
*५)शिक्षण समिती -*
सभापती -शरद द्रौपदा चिंतामण मोरे
उपसभापती -सोनाली तुषार भंदुरे

वरील प्रमाणे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती नगरसचिव संजय नेरकर यांनी दिली. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.


