ब्रेकिंग

पावसाने मारली दांडी. नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट.

१६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात

 

 

१६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात

 

नाशिक : जन्मत

ऑक्टोंबर महिन्यात वाढलेले तापमान व पावसाने मारलेली दांडी. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक मध्ये देखील पावसाने दांडी मारल्यामुळे गंगापूर धरणातील पाणी बाष्पीभवन होऊन कमी होण्याची शक्यता आहे. 37 ते 38 पर्यंत तापमान गेले असून दुपारी रस्ते सून सान दिसत आहे.

यंदा नाशिकच्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असला, तरी अल निनोमुळे राज्यात सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. भविष्यात पाणीटंचाई उद्भवू नये याकरिता राज्य शासनाने पाण्याचे घरणनिहाय आणि वापरनिहाय नियोजन केले आहे. त्याचमुळे येत्या १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपातीचे निर्देश लागू केल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये १० टक्के पाणीकपात झाल्यास ६१० दशलक्ष लिटरपैकी ५५० दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळणार असल्याने नाशिककरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

 

मागील दोन वर्षे महापालिकेने जलसंपदाकडे वाढीव पाण्याची मागणी

 

केली नसल्याने यंदापालिकेने

 

जलसंपदाकडे ६८०० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली आहे. परंतु यंदा म हापालिकेला आपल्याच केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाण्याचे धरणनिहाय आणि वापरनिहाय सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य यात आले आहे त्यात पार्श्वभूमीवर

 

सिंहस्थात एक टीएमसीची आवश्यकता सिंहस्थात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार असल्याने

 

महापालिका प्रशासनाने सिंहस्थासाठी एक टीएमसी पाण्याचे नियोजन केले आहे. सिंहस्थात तब्बल ७९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवण्याचे नियोजन आहे. याबाबतचे पत्र ऑगस्टमध्येच जलसंपदाला महापालिकेने पाठविले आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता सिंहस्थात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची मोठी कसरत होणार आहे.

 

१६ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गंगापूर धरणातील उपलब्ध जलसाठा पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरण्याचे मोठे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. वातावरणातील तापमान वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची भीती आहे. म्यान यंदा पावसाने नाशिकमध्ये

जूनमध्ये दांडी मारल्याने महापालिका प्रशासनाने प्रत्येक आठवड्यात एक दिवस पाणी कपातीची निर्णय घेतला होता. परंतु जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह दारणा, कश्यपी व इतर धरणे भरल्यानंतर पाणी कपातीची निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, आता अलनिनोमुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दहा टक्के पाणीकपात केल जाणार आहे नाशिककरांची डोकेदुखी वाढणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे