मंद धुंद कारचालकाने चार जणांना मखमलाबाद नाक्यावर उडवले. तीन गंभीर जखमी.
पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
, नाशिक जन्मत दारू पिऊन कार चालवणाऱ्या वाहनचालकाने पंचवटीतील मखमलाबाद नाका रोड वर चार जणांना उडवले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढून नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यां वर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.
पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामवाडी रस्त्यावर रविवारी (दि. ४) रात्री सुमारे सव्वाअकरा वाजेच्या सुमारास भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित कारचालकाला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पंचवटी पोलिसांत गुन्हा नोंद असून,
पुढील तपास सुरू आहे. – फिर्यादी शुभम क्षीरसागर (वय २७) आणि त्यांचा लहान भाऊ सौरभक्षीरसागर हे कामानिमित्त रामवाडी परिसरात गेले होते. काम आटोपून
परतत असताना, श्रद्धा पार्कजवळ त्यांना भाडेकरू सागर कापडे आणि त्यांची पत्नी कुसुम कापडे भेटले. घराच्या डागडुगीबाबत चर्चा सुरू असतानाच कोशिरे मळ्याकडून रामवाडी-मखमलाबाद नाक्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच १५ जीए ७८२१ या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. या धडकेत शुभम
क्षीरसागर दूर फेकले गेले. सौरभक्षीरसागर यांच्या तोंडावर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली. कुसुम कापडे यांच्या पाठीला व कमरेला मुका मार लागला, तर सागर कापडे हे कार आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकमध्ये अडकल्याने त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात एका
ट्रक आणि एमएच १५ जीव्ही ६५७५ क्रमांकाच्या मोपेड वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित चालकाचे नाव चेतन संतोष विसपुते असल्याची माहिती समोर आली असून, तो दारूच्या नशेत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. जखमींना तत्काळ नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभम क्षीरसागर यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, सौरभक्षीरसागर, सागर कापडे आणि कुसुम कापडे यांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना पुढील उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



