महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
पक्षकारांच्या परस्पर संमतीने अनेक प्रलंबित महसूल प्रकरणांचा तडजोडीने निपटारा*

*महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*पक्षकारांच्या परस्पर संमतीने अनेक प्रलंबित महसूल प्रकरणांचा तडजोडीने निपटारा*
*अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांची माहिती*
नाशिक जन्मत , दि. ५ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ अंतर्गत आज हेमांगी पाटील, अपर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे महसूल लोक अदालत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
अपर जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांशी संबंधित प्रलंबित अर्धन्यायिक महसूल प्रकरणांच्या अनुषंगाने ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती.
या महसूल लोक अदालतीस पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध प्रलंबित महसूल प्रकरणांतील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षकारांमध्ये परस्पर संवाद व सामंजस्य घडवून आणत, त्यांच्या स्वेच्छेने प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यावर विशेष भर देण्यात आला. यामुळे अनेक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणून त्यांचा निपटारा करण्यात आला.
महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलद, सुलभ व तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ, श्रम व खर्च वाचण्यास मदत होत असून, पक्षकारांमधील संवाद, सामंजस्य आणि परस्पर संमतीच्या माध्यमातून महसूल विवाद निकाली काढण्यासाठी हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
‘महसूल लोक अदालत ही पक्षकारांमधील संवाद, सामंजस्य आणि परस्पर संमतीच्या माध्यमातून प्रलंबित महसूल वाद निकाली काढण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे,’ अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत

अभियानांतर्गत पुढील टप्प्यातही प्रलंबित महसूल प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या कार्यालयामार्फत या अभियानाची अधिकृत प्रसिद्धी करण्यात आली असून, अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी म्हटले आह



