ब्रेकिंग

संस्कारक्षम पिढी घडवून राष्ट्राला सक्षम करण्याचे श्रेय शिक्षकांचे : राजेश उपासनी*.-

ज्ञानसाधना संस्थेतर्फे ४२ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण*

*संस्कारक्षम पिढी घडवून राष्ट्राला सक्षम करण्याचे श्रेय शिक्षकांचे : राजेश उपासनी*

———————————–

*ज्ञानसाधना संस्थेतर्फे ४२ शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण*

नाशिक : जनमत    मानवी विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे आणि राष्ट्राला सक्षम करण्याचे सर्व श्रेय शिक्षकांना द्यावे लागेल. समाजाने शिक्षकांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला पाहिजे. आज-काल सोशल मीडिया, डिजिटल मोबाईल या काळात पालक आणि समाजाने शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय असल्याचे मत प्रसिद्ध उद्योगपती राजेश उपासनी यांनी व्यक्त केले. नाशिक येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक गुणगौरव समारंभात राज्यभरातील २२ अंध व विकलांग गुरुजनांना तर २० इतर गुणवंत शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून राज्यभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी चंद्रपूर, मुंबई, पुणे, दादर, छत्रपती संभाजी नगर, कर्जत, अमरावती, वैजापूर आदी शहरातील गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरणानंतर सत्कारार्थी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. यात सामान्य शिक्षण क्षेत्रातून मोहिनी भगरे व वर्षा भामरे यांनी, तर दिव्यांग शिक्षण क्षेत्रातून शालिकराम राठोड व विजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे रविराज पाटील, राजेंद्र निकम, रमेश आडवाणी, कल्पना भामरे , रीमा गुलाटी, संतोष जाधव, राजाराम गायकवाड अजित कुलकर्णी, संजय परदेशी, वसंत पाटील, प्रदीप जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रा. वसुधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक, संस्थेचा परिचय व पाहुण्यांचा परिचय संस्था अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी केले पुरस्कार्थींचा परिचय प्रा. अनिल भंडारे यांनी केले. संजय घोडेराव, संजय परदेशी, संदीप पवार, ओमकार डावरे, समाधान मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले. आभार प्रदर्शन प्रदीप जगताप यांनी केले.

*दिव्यांग क्षेत्रात कार्यरत शिक्षकांचा सन्मान*

सुरेश होळंबे, रामराव जोजार, सुरेखा जाधव, चंद्रशेखर जाधव, शालिकराम राठोड, संजना काजवे, विलास कांबळे, स्वाती गायकवाड, दामोदर सरगम, सुनिता पाटील, ज्योतिराम माने, विजय देशमुख, गणेश बेडके, सुनंदा सोनार, ललिता आंधळे, शिवाजी राठोड, निता राऊत, हरीविजय ठाकरे, अनिता तांडेल, पल्लवी सोनार, हेमलता वकटे, सुरेखा रोकडे.

*…या शिक्षकांचा सन्मान*

राजेंद्र निकम, अश्विनी पगार, सुरेखा बोरसे, घनश्याम कुवर, मोहिनी भगरे, राजेंद्र पाटील, निलेश तिवारी, मीना देवरे, अर्चना तासखेडकर, सूर्यकांत शिरोडे, महेंद्र कुलकर्णी, वैशाली तिडके, प्राची बेलन, प्रा. बी यु पाटील, वर्षा भामरे, स्मिता क्षत्रिय, रोशनी तडवी, वसंत जाधव, गणेश कुलकर्णी, हर्षला दामधर.

———————————–

*नाशिक : येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी शिक्षक.*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे