ब्रेकिंग

निलवसंत मेडिकल फौंडेशन पुरस्कृत डॉ. वसंतराव स्मृती पुरस्काराचे बुधवारी नाशिक येथे वितरण

निलवसंत मेडिकल फौंडेशन पुरस्कृत डॉ. वसंतराव स्मृती पुरस्काराचे बुधवारी नाशिक येथे वितरण

 

नाशिक । जन्मत

 

येथील निलवसंत मेडिकल फौंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार’ २०२६ या वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा सारख्या अतिदुर्गम भागात दिगंद स्वराज फौंडेशनच्या माध्यमातून सेवेचा यज्ञ पेटवणार्या ध्येयवेड्या श्रद्धा शृंगारपुरे यांना जाहीर करण्यात

 

आला असल्याची माहिती निलवसंत फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

 

दिवंगत आमदार डॉ. वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘योगदान दिनी’ म्हणजे बुधवार दि. ७ऑक्टोबर, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गंगापूर रोड वरील रावसाहेब थोरात हॉल येथे संपन्न होत आहे. पुरस्कार समितीच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

 

पुरस्कारार्थी श्रद्धा शृंगारपुरे यांना १ लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी श्रीमती शकुंतला वाघ, सुरेशबाबा पाटील, बिपिन कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी डॉ वसंत बेळज, डॉ अविनाश आंधळे, डॉ. ओम कुलकर्णी, विजय कोठारी, सौ. रंजना पाटील, वसंतराव खैरनार, डॉ चंद्रकांत संकलेचा, रविंद्र मनियार, प्रणव पवार, बाळासाहेब जाधव, डॉ गायकवाड, सौ. वनश्री पवार, श्री. कुलकर्णी, नारायण थेटे, डॉ शशिकांत जाधव, डॉ प्राची पवार आदींनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे