मायगावदेवी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ
मायगावदेवी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ
नाशिक जन्मत मायगावदेवी : मायगावदेवी पंचक्रोशीतील भाविकांसाठी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ‘श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. मायगावदेवी येथील श्री देवी अंबाबाई देवस्थान येथे या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ज्ञानयज्ञात कथाप्रवक्ते श्रीश्री १००८ अनंतविभूषित वेदवेदांगशास्त्री आचार्य महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती (१८ पुराण कथाकार), सत्संगजी माहेर पिठाधीश्वर, खच्ची आश्रम, जि. जळगाव हे देवी भागवत कथेचे निरूपण करणार आहेत.
सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी कथेचा समारोप होणार असून, समारोपानिमित्त विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
कथेची वेळ सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत असून कथा समारोपानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. कार्यक्रमाचे ठिकाण मायगावदेवी मंदिर, मु.पो. मायगावदेवी असे आहे.
या धार्मिक सोहळ्यास श्री देवी अंबाबाई देवस्थान, मायगावदेवी ट्रस्ट, नवरात्रोत्सव समिती, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, मायगावदेवी यांच्या वतीने भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेआहें.



