सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नाशिक मनपाच्या १०० शाळांमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ उत्साहात; ,

*सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नाशिक मनपाच्या १०० शाळांमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ उत्साहात; शिक्षक, वॉटर ग्रेस कर्मचारी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग..*सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नाशिक मनपाच्या १०० शाळांमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ उत्साहात; शिक्षक, वॉटर ग्रेस कर्मचारी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग..*
नाशिक जन्मत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून आज नाशिक महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विशेष ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ (Deep Clean Drive) अत्यंत प्रभावीपणे पार पडला.
ही मोहीम नाशिकच्या मा. महापौर श्रीम. हिमगौरी आडके यांच्या प्रेरणेने व मनपा आयुक्त श्रीम. मनिषा खत्री यांच्या संकल्पनेतून तसेच उपमहापौर विलास अण्णा शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा अतिरिक्त आयुक्त (३) निलेश भदाणे आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

सकाळी सर्व शाळांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्वच्छतेचा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना स्वच्छतेच्या कामापासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आले. या मोहिमेत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वॉटर ग्रेस कर्मचारी आणि जागरूक पालकांनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून श्रमदान केले. वॉटर ग्रेस कर्मचारी व अग्निशामक दलाच्या पाण्याच्या वाहनांच्या मदतीने वर्गखोल्या, व्हरांडा, कार्यालय, स्वच्छतागृहे आणि संपूर्ण शालेय परिसर पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवून काढण्यात आला.

पाण्याचा अपव्यय टाळत, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून गोळा झालेला सर्व कचरा थेट घंटागाडीत जमा करण्यात आला. तसेच सर्व शाळांकडून स्वच्छतेपूर्वीची व स्वच्छतेनंतरची छायाचित्रे संकलित करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे नाशिक मनपाच्या शाळांचा संपूर्ण परिसर स्वच्छ झाला असून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व प्रसन्न शैक्षणिक वातावरण मिळाले आहे.



