ब्रेकिंग

हिरवळीवर बसून पालकमंत्र्यांचा अंगणवाडी सेविकांशी संवाद*  *ड्रेसकोड, सनकोटसह विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद*

*हिरवळीवर बसून पालकमंत्र्यांचा अंगणवाडी सेविकांशी संवाद*

 *ड्रेसकोड, सनकोटसह विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद*

नाशिक  जन्मत    महापालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर जमिनीवर बसून पालकमंत्री ना.गिरीश महाजन, यांच्यासह पदाधिकारी यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य शिक्षिकांशी संवाद साधला. मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री व नगरसेवक दिनकर पाटील यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य शिक्षिकांशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. विशेषतः दरवर्षी तीन हजार रुपयांची वेतनवाढ देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली.

अंगणवाडी सेविकांनी नियमित वेतन, सेवानिवृत्ती वेतन, ड्रेसकोड यांसह विविध मागण्या यावेळी संवादातून मांडल्या.

शिक्षकांनीही वेतनवाढीसह ड्रेसकोड आणि सनकोट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या प्रश्ना संदर्भात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधन वाढी बाबत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी व मनपा नगरसेवकांनी ठराव मंजूर केलेला आहे. तसेच शासनाच्या महिला व बालकल्याण समितीकडे आमदार देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला होता. यातील काही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

 

 

विशेष म्हणजे, मान्यवरांनी पदाचा औपचारिकपणा बाजूला ठेवत कर्मचाऱ्यांसोबत जमिनीवर बसून संवाद साधला. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील संवाद अधिक मोकळा झाला. कर्मचाऱ्यांच्या अडचणी थेट जाणून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला. ‘पद मोठे असले तरी संवाद जमिनीवरचा’ अशीच भावना यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे