केटीएचएम’च्या प्रा. डॉ. आरती मंत्री यांना पीएच.डी.*

*‘केटीएचएम’च्या प्रा. डॉ. आरती मंत्री यांना पीएच.डी.*
——————————
*नाशिक :जनमत * केटीएचएम महाविद्यालयातील बी.व्होक. मास कम्युनिकेशन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. आरती सुधीर मंत्री यांनी जयपूर येथील ज्योती महिला विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
मास कम्युनिकेशन व मिडिया क्षेत्रातील ‘भारतीय न्यूजरूममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्याचा पत्रकारितेवरील नैतिक परिणामांचा अभ्यास’ या विषयावर केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. प्रदान केली. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देत त्यांनी हे शैक्षणिक यश संपादन केले आहे. डॉ. रिना राणी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
डॉ. आरती मंत्री यांच्या यशाबद्दल मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे यांनी अभिनंदन केले. त्यांच्या पीएच.डी.मुळे केटीएचएम महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानात आणखी भर पडली आहे.
*नाशिक : पीएच.डी. मिळाल्याबद्दल केटीएचएम महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. आरती सुधीर मंत्री यांचा सत्कार करताना मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे.*



