ब्रेकिंग
मनपाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती साजरी

*मनपाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती*
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्षा जवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, साहेबराव भोसले, महेंद्र केंदळे,मिलिंद राजगुरू, आकाश शिनगान, प्रकाश येलमामे, रमेश पागे, मनोज गायधनी,मयूर भदाणे, सुरक्षा विभागाचे भाऊसाहेब ताजनपुरे,विजय खोडे,प्रशांत निकम आदींसह मनपातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



