नासिक दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू. व्यवसायिक पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

प्रतिनिधी, नाशिक जनमत
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली नवी दिल्लीसाठीची सकाळची विमानसेवा गुरुवारपासून (दि. १ ऑक्टोबर) पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. नाशिक येथून आता दिल्लीला जाण्यासाठी सकाळी व रात्री अशी दोन विमाने उपलब्ध राहणार आहेत.
ओझर विमानतळावरून दिल्लीसाठी सकाळ सत्रातील विमानसेवा नियमित उपलब्ध होती.
सकाळची दिल्ली
66 विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही सेवा नियमित सुरू राहावी.
भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी
… असे आहे वेळापत्रक
नवी दिल्ली येथून दररोज सकाळी ६.४० वाजता विमान नाशिककडे रवाना होऊन ८.३० वाजता ओझर विमानतळावर पोहोचेल. सकाळी ९ वाजता दिल्लीसाठी उड्डाण होऊन विमान १०.५० वाजता दिल्लीला पोहोचेल. तर सायंकाळी ६.४० वाजता दिल्लीहून विमान निघून ते ८.३० वाजता नाशिकला पोहोचेल. नाशिकहून रात्री ९ वाजता उड्डाण घेऊन विमान १०.५५ वाजता दिल्लीला पोहोचेल.
त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, अधिकाऱ्यांची सोय होत होती. मात्र,
गेल्या २८ मार्चपासून ही सेवा तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आली. ती पूर्ववत होऊ शकली नव्हती. त्यामुळे
जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत होती. दळणवळण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे खासदार भगरे यांनी केंद्रीय मंत्री नायडू यांना निवेदन देऊन दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. ते २४ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. त्यानुसार ओझर येथून आता सकाळी व सायंकाळी अशी दोन विमाने दिल्लीसाठी झेपावतील. २४ ऑक्टोबरनंतर हिवाळी वेळापत्रक जाहीर केले जाईल. दरम्यान, सकाळ सत्रातील दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यामुळे द्राक्ष, कांदा व अन्य कृषी उत्पादनांच्या व्यापारासह उद्योग, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन व शासकीय कामकाजासाठी दिल्लीला जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नासिक दिल्ली विमानसेवेमुळे हे अंतर दोन तासा वर आल्याने नाशिक करांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुंभमेळ्यामध्ये दिल्ली व उत्तर भारतातील नागरिकांसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे



