ब्रेकिंग

मखमला बाद परिसरातील प्रसन्न बंगल्यात शिक्षक नेते सोनवणे यांची आत्महत्या.

शिक्षक नेते सोनवणे यांची आत्महत्या
शेतजमिनीचा वाद; आजारपणाच्या अस्ततेमुळे पाऊल

 

प्रतिनिधी, नाशिक जन्मत  नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरातील वडजाई माता नगर येथील प्रसन्न बंगल्यात राहणारे प्रकाश सोनवणे यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर अॅण्ड नॉन-टीचिंग को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि शिक्षकांचे लढवय्ये नेते प्रकाश हिला सोनवणे (वय ६५) यांच्या आत्महत्येमुळे शिक्षण क्षेत्र सुन्न झाले

आहे. बुधवारी (दि. ३०) दुपारी ही घटना घडली.

प्रकाश सोनवणे

 

शेतजमिनीचा वाद आणि पोटाच्या विकारामुळे त्रस्त होऊन सोनवणे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील आरई येथील वडिलोपार्जित आणि अन्य

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पंचवटी पोलिसांच्या हाती लागली आहे.

शेतजमिनीच्या वादातून लहान भाऊ आणि पुतण्या त्रास देत होते. या कौटुंबिक त्रासासोबतच गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या पोटाच्या आजारपणामुळे त्रस्त होऊन आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सोनवणे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.

बुधवारी (दि. ३०) दुपारी सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास सोनवणे यांनी मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगरातील प्रसन्न बंगल्यात आत्महत्या केली. त्यांचे मेव्हणे महेंद्र पाटील यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून

त्यांना मृत घोषित केले.

आहेत. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहायक उपनिरीक्षक सुनील शेवाळे हे कुटुंबातील सदस्यांसह नातेवाइकांचे जबाब नोंदवत आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत नमूद नातेवाइकांच्या चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी सोनवणे यांच्या पत्नी संगिता यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मा हिला सोनवणे आणि नरेंद्र धर्मा सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे