पत्रकार बंधूंचा सार्वजनिक गणेशोत्सव 51 फुटी भव्य गणेश मूर्ती देखावा.

सोहळ्याने गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारिता क्षेत्रातील बांधवांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवासारखा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. पत्रकारिता ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित नसून समाजातील विविध घटकांना जोडण्याचे आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम
असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, क्रांतिवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, नगरसेविका अदिती पांडे, ज्येष्ठ संपादक संपत देवगिरे, बापूसाहेब पगारे, ड. उमेश वालझाडे, दिगंबर नाडे, मयूर मगर, दीपक डोके, ऋतुराज पांडे, निलेश पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव किरण नाईक यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष संदेश केदारे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश रूपवते, जयेश साबळे, संदीप नवसे, वैभव घुगे, प्रकाश धुर्वे, नसीर मन्सूरी, हेमंत काळमेख, रेणू गायकवाड आणि शिवाजी आढागळे यांच्या पुढाकारातून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.हा भव्य महादेखावा पाहण्यासाठी नाशिककरांनी शालिमार येथील बिडी भालेकर मैदानावर आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदेश केदारे यांनी केले. 51 फुटी गणेश बाप्पा मूर्ती भाविकांमध्ये आकर्षण ठरणार आहे.



