महिला बालविकास विभागाकडून प्रशिक्षण न देताच १२ कोटी दिल्याचा ठपका. अधिकार्यांना बदलीचा डोस.
स्थायीच्या सभेत सदस्यांचा आक्षेप, चौकशी समिती गठित, दूषित पाण्यावरून गदारोळ
प्रतिनिधी | नाशिक जनमत नाशिक महानगरपालिकेच्या काल झालेल्या साथ्यी सभेमध्ये दूषित पाणीपुरवठा व प्रशिक्षण न देताच 12 कोटी रुपये दिल्याची चर्चा झाली यावेळी गदारोळ झाला.
महिला बालविकास विभागा कडून महिलांना दिले जाणारे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण वादात सापडले आहेत. या विभागासाठी तीन कोटीची तरतूद असताना महिलांच्या प्रशिक्षणावर तब्बल १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण नेमके किती ठिकाणी व किती महिलांना दिले, याबाबतची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला १५ दिवसांत अहवाल -सादर करावा लागणार आहे.

महिला कौशल्य प्रशिक्षणावर १२ कोटींची रक्कम अदा केल्याची माहिती उपायुक्त नितीन नेर यांनी सभागृहासमोर स्पष्ट करताच सर्वच सदस्य आक्रमक झाले होते. नेमके प्रशिक्षण कुठे कुठे दिले, या मुद्द्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नाशिक शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याची नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनेक भागात कमी पाणी देखील येत आहे. नागरिकांच्या तक्रारजी दखल न घेणाऱ्या व सभेमध्ये गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचा डोस काल सभापती सानप यांनी अधिकाऱ्यांना दिला
शहरातील विविध भागात खडी मुरूम टाकण्याची व रस्ते दुरुस्ती मंजूर कामे अद्याप सुरू झालेले नाहीत ठराव मंजूर होऊ नये ठेकेदारांना कार्यरंभ देश का दिले जात नाही असा प्रश्न मुकेश शहाणे यांनी उपस्थित केला काम करण्याचा आदेश असताना देखील कामे न करणाऱ्या ठेकेदारांना वर खडक कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली काळा यादीत त्यांचे नाव टाकावे असे नगरसेवक योगेश गाडेकर यांनी सभेत सांगितले.
पल्लवी गणोरे नगरसेवक यांनी सिडको परिसरात पिवळसर दूषित पाणी येत असल्याची गंभीर तक्रार करत नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न उपस्थित केला
तर सरिता सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक चार मध्ये पाणीपुरवठा अत्यंत अनियमित असल्याचे सांगत नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत अधिकारी फोन उचलत नसल्याचेही त्यांनी सांगितले बांधकाम विभागाचे अधिकारी सभेला उपस्थित नसल्याने प्रभागात असलेल्या समस्या कुणापुढे मांडायच्या असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळेस स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी सांगितले की लवकरच या अधिकाऱ्यांची उचल बांगडी करू असे ते यावेळी म्हणाले. नाशिक शहरात असलेल्या सर्वच मॉलमध्ये विना सुलभ पार्किंग करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनावर दिले..