नाशिक मध्ये साथीच्या आजाराचा सुळसुळाट स्वाइन फ्लू डेंगू ची साथ.
अनेक घरा घरामध्ये सर्दी खोकला ताप चे रुग्ण. महानगरपालिका घराघरात सर्वेक्षण करणार..
– डेंग्यू, साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेची 300 पथके घराघरांत
धडक मोहीम सुरू: आजपासून २० सप्टेंबरदरम्यान सर्वेक्षण
प्रतिनिधी नाशिक जन्मत
|
नाशिक स्वाइन फ्लू डेंगू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात वाढले आहेत. अनेक घरामध्ये घरातील एक व्यक्ती आजारी पडली की दुसऱ्या व्यक्तीला त्याचा संसर्गजन्य होतो अशी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. सुरुवातीला सर्दी ताप थंडी घसा दुखणे खोकला अंग दुखणे अशक्तपणा अशी लक्षणे सध्या रुग्णांमध्ये दिसून येत आहे. शहरातील लहान मोठे क्लिनिक मध्ये सध्या रुग्णाची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लूचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच डेंग्यू संशयित रुग्णांचा आकडा २५ वर पोहचल्याने १० ते २० सप्टेंबरदरम्यान ३०० हून अधिक पथके घराघरांत जाऊन आरोग्य सर्वेक्षण करणार आहेत. तापाचे रुग्ण शोधण्यासोबतच घरांमध्ये व परिसरात साचलेले पाणी आणि डासांची उत्पत्तीस्थानेही तपासली जाणार आहेत.
जूननंतर डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना
अशी आहे डेंग्यूबाधितांची स्थिती
जून : ८ जुलै : ३३ ऑगस्ट : ४५ सप्टेंबर (९ तारखेपर्यंत) : २५ रुग्ण
– एकूण : १११ डेंग्यूसदृश बाधित

वेग देण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आशासेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, एएनएम, कीटक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. ही पथके घरे, रस्ते, वसाहती, कॉलनी आणि परिसराचे सर्वेक्षण करतील. तापाचे रुग्ण आढळल्यास प्रकृतीची माहिती घेऊन गरजेनुसार त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात संदर्भित केले जाणार आहे. •



