ब्रेकिंग

गोदा आरतीच्या वादावर समन्वयाचा तोडगा; ‘नाशिक अमृततुल्य’च्या चहापानाने चर्चेचा गोड शेवट!

 

गोदा आरतीच्या वादावर समन्वयाचा तोडगा; ‘नाशिक अमृततुल्य’च्या चहापानाने चर्चेचा गोड शेवट!

नाशिक जन्मत      कुंभ आयुक्त शेखर सिंह व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या पुढाकाराने दोन्ही आरती समित्यांमध्ये सकारात्मक चर्चा; ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण, गोदा महाआरती व महाशंखनाद उत्साहात होणारआहें

: नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री गंगा-गोदावरी आरतीच्या आयोजनावरून निर्माण झालेल्या मतभेदांवर अखेर समन्वयाचा मार्ग निघाला आहे. कुंभ आयुक्त मा. शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मा. मनीषा खत्री यांच्या पुढाकाराने रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पंचकोठी गंगा-गोदावरी पुरोहित संघ यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन दोन्ही बाजूंनी परस्पर समन्वय राखण्यास सहमती दर्शविली.

आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या धार्मिक महत्त्वाचा आणि नाशिकच्या आध्यात्मिक परंपरेचा सन्मान राखत सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, या भूमिकेतून चर्चा करण्यात आली. संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करून भविष्यातही समन्वय कायम ठेवण्याचा निर्धार दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण, महाआरती आणि महाशंखनाद!

या समन्वयानंतर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ध्वजारोहण, गोदा महाआरती आणि महाशंखनाद हे कार्यक्रम उत्साहात पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने नाशिकच्या धार्मिक परंपरेचे वैभव जपण्यासाठी आणि भाविकांमध्ये एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा समन्वय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या चर्चेत जयंतराव गायधनी, भक्तीचरणदास महाराज, शांताराम भानोसे, नरसिंहकृपा प्रभु महाराज, चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल, सौरभ गायधनी, शेखर शुक्ल, अमित पंचभाई, कल्पेश दीक्षित, आलोक गायधनी प्रतीक शुक्ल, मुकुंद खोचे, राजेंद्र फड,प्रफुल्ल संचेती,धनंजय बेळे, शिवाजी बोंदारडे, वैभव क्षेमकल्याणी, चिराग पाटील, विनीत पिंगळे आणि चैतन्य गायधनी यांच्यासह विविध मान्यवर व संयोजक उपस्थित होते.

 

 

‘नाशिक अमृततुल्य’च्या चहापानाने चर्चेचा गोड शेवट!

विशेष म्हणजे, या संपूर्ण चर्चेची सांगता प्राधिकरण कार्यालयासमोरील नव्याने सुरू झालेल्या ‘नाशिक अमृततुल्य’ या चहापान केंद्रात झाली. दोन्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित संयोजकांसमवेत चहापान केले. चर्चेतून निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाला या अनौपचारिक भेटीने अधिक आपुलकीची जोड मिळाली.

 

 

आरतीच्या आयोजनावरून निर्माण झालेले मतभेद संवादातून दूर करण्याच्या या प्रयत्नामुळे नाशिकमध्ये धार्मिक एकोपा, परस्पर आदर आणि समन्वयाचा संदेश गेला आहे. वादापेक्षा संवाद, मतभेदांपेक्षा समन्वय आणि संघर्षापेक्षा एकात्मता महत्त्वाची, हे या घडामोडींमधून अधोरेखित झाले.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे