महापौर हिमगौरी आहेर आडके यांचे मनपाचे विभाग प्रमुख खाते प्रमुख यांच्या वतीने स्वागत.

नाशिक जनमत संयुक्त राष्ट्राच्या Un Forum of mayors या जागतिक व्यासपीठावर भारताचे आणि नाशिक शहराचे प्रभावी प्रतिनिधित्व केल्याबद्दल शहराच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांचे मनपाचे विभाग प्रमुख खाते प्रमुख यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.त्यावेळी महापौरांनी सर्वांशी सुसंवाद साधला.


महापौरांचे शासकीय निवासस्थान रामायण येथे मनपाचे विभाग प्रमुख, खाते प्रमुख यांच्याशी संवाद साधताना जागतिक स्तरावर सिंहस्थ कुंभमेळ्याचे देण्यात आलेले निमंत्रण,जिनिव्हातील बसचे थांबे,चौक

विकसीकरण,जागतिक स्तरावरील शहर, मूलभूत सुविधा नागरिकांचे राहणीमान उंचावणे, नियम आणि वेळेला असणारे महत्त्व, वेळेचा व टेक्नॉलॉजीचा वापर अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करून जागतिक परिषदेत सहभागी होण्याची मिळालेल्या संधीमुळे इतर देशातील महापौरांशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी या निमित्ताने मिळाली असल्याचे महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,नितीन नेर, नितीन पवार, सुवर्णा दखणे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, वित्त व लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट ,मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, सहाय्यक संचालक नगर रचना दिव्यांक सोनवणे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे,सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेटे,डॉ.जितेंद्र धनेश्वर,शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी,नगरसचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, विभागीय अधिकारी चंदन घुगे,आनंद जाधव, नाना साळवे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.


