ब्रेकिंग

नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची पाईपलाईन गळती बंद करण्याची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी शनिवार दि २४/१०/२०२६ शट डाऊन विषयी नागरिकांना माहिती.

 

 

नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची पाईपलाईन गळती बंद करण्याची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी शनिवार दि २४/१०/२०२६ शट डाऊन बाबत.*

 

नाशिक जनमत      नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची पाईपलाईन गळती बंद करण्याची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी शनिवार दि २४/१०/२०२६ रोजी शट डाऊन घेण्याचे नियोजित करण्यात आले असुन सदर कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार आहे.

 

*नाशिक पुर्व विभाग*

१) नाशिक पुर्व प्र.क्र.३० मधील लेखानगर येथे सर्व्हीसरोड लगत मुख्य ३०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन वरील गळती बंद करणे.

२) नाशिक पुर्व प्र.क्र.३० मधील कला नगर येथील जलकुंभाची वितरण वाहीनी अस्तीत्वातील वितरण वाहीनीला जोडणे.

वरील सर्वे कामास अंदाजे १२ तास लागणार आहे .

 

*नाशिक पश्चिम विभाग*

१) रामराज्य जलकुंभ येथील पाईपलाईन गळती बंद करणे.

२) त्रंबक रोड ,पिटीसी भिंतीलगत पाईपलाईन गळती बंद करणे.

३) जीपीओ जलकुंभ येथे नवीन व्हॉल्व बसविणे.

४) बी.डी. भालेकर मैदान येथील पाईपलाईनवर टी टाकणे.

वरील सर्वे कामास अंदाजे १२ तास लागणार आहे .

 

*नाशिकरोड विभाग*

१) पाटील गॅरेज मागे मंदिराच्या बाजूला शिरसाट यांच्या घराजवळ पाईपलाईन लिकेज काढणे.

२) महेश नगर कलंत्री यांच्या घराजवळ पाइपलाइन लिकेज काढणे.

३) नगरसेवक हांडोरे मळा वडनेर रोड च्या कडेला पाईपलाईन लिकेज काढणे.

४) रेजिमेंटल प्लाझा समोर एचडीएफसी बँकेसमोर दूषित पाणीपुरवठा शोधुन काढणे.

५) वडनेर चौफुली देवळाली कॅम्प रोड राठोड यांच्या घराजवळ पाईपलाईन लिकेज काढणे.

६) देवळाली गाव मिस्तरी इंजीनियरिंग जवळ लाईटच्या डीपी जवळ पाईपलाईन लिकेज काढणे.

७) मुक्तिधाम टाकी खालील तीनशे एमएम वाल लिकेज बंद करून ग्रीसिंग करणे.

८) देवळाली गाव राजवाडा तीनशे एम एम वाल ग्रीसिंग करणे.

९) विहित गाव टाकी आउटलेट ३०० एम एम वॉल लिकेज बंद करणे.

 

 

१०) जय भवानी टाकी समोर पाईपलाईन लिकेज काढणे इत्यादी कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

वरील सर्वे कामास अंदाजे १२ तास लागणार आहे .

 

*पंचवटी विभाग*

१) पंचवटी प्र.क्र. ०४ मधील कॅनॉलवरील म्हसरुळ बोरगड उर्ध्ववाहीनीची दुरुस्ती करणे.

३) पंचवटी प्र.क्र.०३ अमृतधाम चौफुलीवर मुख्य वितरण वाहीनीवर क्रॉस कनेक्शन करणे.

३) पंचवटी प्र.क्र. ०३ मधील शक्तीनगर नवीन उर्ध्ववाहीनीचे क्रॉस कनेक्शन करणे.

वरील सर्वे कामास अंदाजे १२ तास लागणार आहे .

सातपुर विभाग

१) संतकबीर नगर, साईमंदीरजवळ ५०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन गळती बंद करणे.

२) आनंदी आंगन जॉगींग ट्रॅक साईमंदीरजवळ ५०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन गळती बंद करणे.

३) सिरीन मिडोज जवळ तिरुमाला ओमकार साईमंदीरजवळ १२०० मी.मी. व्यासाची पाईपलाईन गळती बंद करणे.

वरील सर्व कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे १२ तास लागतील.

 

*नविन नाशिक विभाग*

१) नविन नाशिक प्र.क्र. २७ मधील पाथर्डी फाटा जलकुंभ क्र ०४ चा ८०० मी.मी. व्यासाच्या व्हॉल्ववरील गळती बंद करणे.

२) नविन नाशिक प्र.क्र. २७ मधील स्मशान भूमी अंबडगाव जवळ ९०० मी.मी. व्यासाची मुख्य पीएससी पाईपलाईनवरील गळती बंद करणे

३) नविन नाशिक प्र.क्र. २८ मधील डीजीपी नगर माऊली लॉन्स येथील ७०० मी.मी. व्यासाच्या मुख्य गुरुत्व वाहीनीवरील गळती बंद करणे.

४) नविन नाशिक विभागातील विल्हाळी जलशुध्दीकरण केंद्र येथील ६०० मी.मी. व्यासाच्या व्हॉल बसविणे. –

वरील सर्वे कामास अंदाजे १२ तास लागणार आहे.

 

उपरोक्त नमुद कामे करणेकरिता अंदाजे १२ ते १८ तास पाणी पुरवठा बंद ठेवणे आवश्यक व क्रमप्राप्त असुन सदर कामे हे शनिवार दि २४/१०/२०२६ रोजी शट डाऊन घेऊन कामे करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे संपुर्ण नाशिक शहराचा शनिवार दि २४/१०/२०२६ रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवणेबाबत व रविवार दि. २५/१०/२०२६ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.  असे कार्यकारी अभियंता यांनी आवाहन केलं आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे