ब्रेकिंग

प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार** *शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव*

*प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार**

*शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव*

*दिंडोरी* : नाशिक जनमत   येथील प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, ज्ञानदानाप्रती असलेली निष्ठा आणि समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन डॉ. वाघ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक व मोफत शिक्षणाचा पाया भक्कम करणारे महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक विचारांना समर्पित असलेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.

महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह, रयत प्रकाशन आणि गिरिप्रेमी ग्रुप, पुणे यांच्या वतीने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संस्थेची सर्व कार्यकारिणी, दिंडोरी-पेठ विभागाचे संचालक प्रवीण जाधव, सर्व संचालक, शिक्षणाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच प्राध्यापकवर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. वाघ यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेणारा असून, महाविद्यालयासाठी आणि दिंडोरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला अधिक प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या गौरवामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल. डॉ. वाघ यांच्या यशाबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी आनंद व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे