केटीएचएम कॉलेज पूल ते महामार्ग बसस्थानक मार्गावरील युटिलिटी कामे अंतिम टप्प्यात

केटीएचएम कॉलेज पूल ते महामार्ग बसस्थानक मार्गावरील युटिलिटी कामे अंतिम टप्प्यात
नाशिक :जनमत आगामी सिंहस्थ कुंभमेळा, शहरातील वाढती वाहतूक आणि घाट परिसरातील संपर्क व्यवस्था लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पश्चिम विभागातील महत्त्वाच्या घाट जोडणाऱ्या मार्गावरील युटिलिटी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
केटीएचएम कॉलेज पूल ते जुना गंगापूर नाका, शरणपूर पोलीस चौकी, बॉश (मायको) सर्कल, चांडक सर्कल ते महामार्ग बसस्थानक या सुमारे ३.९६० किलोमीटर लांबीच्या मार्गावर विविध पायाभूत सुविधा कामे सुरू आहेत.

सिंहस्थ काळात घाटांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच पार्किंग व्यवस्थेशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
या मार्गावरील पाणीपुरवठा विभागाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तसेच ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी), एमएनजीएल गॅस पाइपलाइन आणि पावसाळी गटार (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) यांची कामेही वेगाने सुरू आहेत.
महानगरपालिकेकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युटिलिटी कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण अधिक वेगाने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वाहतूक वळविण्याची तात्पुरती योजना
सदर युटिलिटी कामांच्या अनुषंगाने जुना गंगापूर रस्ता ते याहू हॉटेल दरम्यानच्या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली असून वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नकाशाचे विश्लेषण खालीलप्रमाणे
रंग
वाहतूक स्थिती
लाल रंग
वाहतुकीसाठी बंद असलेला मार्ग
हिरवा रंग
वाहतुकीसाठी खुला असलेला मार्ग
जांभळा रंग
पर्यायी मार्ग
ठळक मुद्दे
• सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी घाट जोडणारा महत्त्वाचा मार्ग.
• एकूण रस्त्याची लांबी ३.९६० किमी.
• पाणीपुरवठा विभागाचे काम १०० टक्के पूर्ण.
• ओएफसी व महा आयटी सीसीटीव्ही काम ९४ टक्क्यांहून अधिक पूर्ण.
• एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे काम प्रगतिपथावर.
• स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम प्रगतिपथावर.
• युटिलिटी कामे पूर्ण होताच रस्ता विकासाला गती.
• जुना गंगापूर रस्ता ते याहू हॉटेलदरम्यान एका बाजूची वाहतूक तात्पुरती बंद.
• पर्यायी मार्गाची व्यवस्था उपलब्ध.
रस्ता कामाची माहिती
केटीएचएम कॉलेज पूल ते जुना गंगापूर नाका, शरणपूर पोलीस चौकी, बॉश (मिको) सर्कल, चांडक सर्कल ते महामार्ग बसस्थानक
घटक
तपशील
रस्त्याचा प्रकार
डांबरी + काँक्रीट
विभाग
नाशिक पश्चिम
एकूण लांबी
३,९६० मीटर (३.९६० किमी)
युटिलिटी कामांचा प्रगती आढावा
एकूण कार्यक्षेत्र : ९,७९५ मीटर
कामाचे स्वरूप
कार्यक्षेत्र (मीटर)
स्थिती
ओएफसी व महा आयटी सीसीटीव्ही
१,४३३
काम प्रगतिपथावर
एमएनजीएल गॅस पाइपलाइन
२,८४१
काम प्रगतिपथावर
पाणीपुरवठा
१,४३६
१०० टक्के
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
४,०८५
काम प्रगतिपथावर
“सिंहस्थाच्या दृष्टीने येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रस्त्यांची कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होईल.”



