ब्रेकिंग

नाशिक तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस 13 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 

 

 

 

 

 

 

 

नासिक जनमत    नाशिक तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस 13 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

 

दि. 27/04/2026 रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील मा. जिल्हा न्यायाधीश श्री. डी. व्ही. कोटे (कोर्ट क्र. 05) यांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 47/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 98, 376(2), पोस्को कलम 5 व 6 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

 

सदर गुन्ह्यात आरोपीस भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 98, 376(2) मध्ये दोषी ठरवून 13 वर्षे सक्तमजुरी व ₹25,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 06 महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच पोस्को कलम 5 व 6 अंतर्गत 13 वर्षे सक्तमजुरी व ₹25,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 06 महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच कलम 12 अंतर्गत 03 वर्षे सक्तमजुरी व ₹10,000/- रुपये दंड, दंड न भरल्यास 02 महिने कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपीस ₹60,000/- रुपये दंड व नुकसानभरपाई म्हणून ₹50,000/- रुपये शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

 

 

घटनेचा तपशील:

 

सदर घटना दि. 19/09/2024 रोजी सायं. 7:30 वा. सुमारास नाशिक तालुक्यातील माध्यमिक शाळेजवळ घडली.

यातील आरोपीने फिरण्यासाठी मुलीला फूस लावून तिला दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

घटनेनंतर मुलीला सोडून आरोपी फरार झाला.

 

 

तपास व कारवाई:

 

सदर गुन्ह्याचा तपास नाशिक तालुका पोलीस ठाणे येथील महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मुग्धा नाईक यांनी केला.

तपासादरम्यान आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

सरकारी अभियोक्ता श्रीमती लीना जगताप यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

 

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 

 

 

सदर गुन्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. बालासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.आहें

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे