ब्रेकिंग

मुलाला मोबाईलचे वेड. वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

 

संग्रहित छायाचित्र

नासिक जनमत न्यूज    आजच्या डिजिटल युवा मध्ये घरोघरी मोबाईल झालेले आहेत आई-वडिलांपासून एक वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या माणसापर्यंत मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसू लागले आहेत. पाळण्यातून बाहेर येण्याच्या अगोदरच बाळ रडत असलं तर आई मोबाईल वरील गाणे वाजून बाळाला शांत करते. बाळ देखील मोबाईल बघून शांत होतो. पाळण्यातच असे संस्कार करू लागल्याने मोबाईलचे वेड मोठ्या प्रमाणात मुलांना लागले आहे. याचाच परिणाम म्हणून हरसुल येथील 14 वर्षे मुलाला मोबाईलचे वेड लागले होते. मुलगा अभ्यास करत नाही या कारणातून हरसुल त्या वैष्णवी नगर मध्ये रविवारी रात्री सार्थक शंकर पिंपळगे वय 14 यास वडील शंकर सुखदेव पिंपळके यांनी केलेल्या मराहाणीत मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल झाला याबाबत सविस्तर वृत्त  असे की

संग्रहित छायाचित्र.

हरसुल पोलीस  ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवनगरमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली असून, वडिलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सार्थक शंकर पिंपळके (वय १४) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वैष्णवनगरमध्ये राहणाऱ्या सार्थकला मोबाइलचे आकर्षण होते. रविवारी (दि. २६) रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने हातात मोबाइल घेतला. ही गोष्ट त्याचे वडील शंकर पिंपळके (वय ४०) यांना आवडली नाही, रागाच्या भरात त्यांनी सार्थकला

( पुढचा पॅरेग्राफ सोडून पुढे वाचावे )

 

( आईच्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आई सुनीता यांनी टाहो फोडला. हे दृश्य पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मुलाचा अंत्यविधी आटोपल्यानंतर सुनीता यांनी धीर करून पोलिसांत धाव घेऊन पतीच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार हरसूल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित पिंपळके याला अटक केली.)

 

लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आई सुनीता पिंपळके यांनी सार्थकला . वाचविण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या पित्याने ‘हा माझा मुलगा

 

नाही, याला मी संपवून टाकेन’, अशी भूमिका घेतली. सार्थकला घराबाहेर लाकडी फळी व चोपणीने मारहाण केली. यात सार्थकचा मृत्यू झाला. या घटनेने हरसुल तालुका हद रला आहे. मोबाईलच व्यसन  एखाद्या दारूच्या व्यसनासारखे झालेले आहे. सोशल मीडिया वरील  रील विविध गेम मुलांना आकर्षित करत असून घडलेल्या घटनेचे तात्पर्य ओळखून मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे आई-वडिलांना विचारून रिकाम्या वेळेत मोबाईलचा वापर करावा. अतिशय वाईट अशी घटना घडली असून या घटनेने नाशिक जिल्हा व शालेय विद्यार्थी घाबरले आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे