ब्रेकिंग

गंगापूर रोडवर होणार वाहतूक कोंडी कमी.नवीन समांतर रस्ता होणार

महापौर हिंमगोरी आडके यांनी केली महासभेत घोषणा. 66 कोटी रुपये खर्चून पंधरा मीटर रस्ता होणार.

, नाशिक जन्मत कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरणाचे काँक्रिटीकरणाचे कामे चालू आहे. सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने गंगापूर रोड नाशिक शहरातील रस्ते व वाहतूक एकतर्फी चालू आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ वाहतुकीचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे गंगापूर रोडवरील मोतीवाला कॉलेज ते महात्मा नगर या रस्त्याचे रुंदीकरण होणार असून एक नवीन समांतर रस्ता तयार करण्यात येणार आहे याबाबत काल महासभेत घोषणा करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती अशी की

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या वाहतुकीच्या दष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर रोडवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मोतीवाला कॉलेज ते महात्मानगर दरम्यान ६६ कोटी रुपये खर्चाच्या १५ मीटर रुंदीचा रस्ता केला जाणार आहे. या प्रस्तावाला महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मंजुरी दिली आहे. उपमहापौर विलास शिंदे यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.

 

शहरात गंगापूर रोडवर झपाट्याने नागरिकरण झाल्यामुळे सध्या सर्वाधिक वर्दळीचा रस्ता बनला आहे.

 

कॉलेज रोड, आनंदवली, सिटी सेंटर मॉल, सिरीन मेडोज, परिसरात वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक याच कुंभमेळा काळात मार्गावरून होते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने गंगापूररोडला समांतर रस्ता म्हणून मोतीवाला कॉलेज ते महात्मानगर हा भोंसला मिलिटरी स्कूलमधून जाणारा रस्ता मंजूर करण्यासाठी उपमहापौर विलास शिंदे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अखेर या ६६ कोटींच्या १५ मीटर स्स्त्याला मंजुरी देण्याची घोषणा महापौर आहेर-आडके यांनी केली आहे. या हिमगौरी

 

रस्त्याची रुंदी १५ मीटर

 

६६ कोटी रुपये येणार खर्च

 

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण निधी उपलब्ध करून देणार

 

रस्त्यासाठी लागणारी जमीन कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून महापौरांनी स्पष्ट केले आहे. ताब्यात घेतली जाणार असल्याचे

 

( कन्स्ट्रक्शन टीडीआरमधून रस्ते विकास

शहर विकास आराखड्यातील रस्ते विकसीत करण्यासाठी महापालिकेने

समांतर रस्ता पूर्ण रोडवरील ३० ते ४० टक्के वाहतुकीचा भार कमी होणार असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यासाठी निधी 66 झाल्यानंतता पापूर

 

उपलब्ध करून देणार आहे. – विलास शिंदे, उपमहापौर)

 

आता कन्स्ट्रक्शन टीडीआर देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवकांनी रस्ते सुचविल्यास महापालिका त्यासाठी टीडीआर देऊ

 

करणार असून, हा धोरणात्मक निर्णय असल्याने पुढील महासमेत प मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. शहर विकास आराखड्यात नमूद असूनही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. विकास आराखड्यातील रस्ता ताब्यात घेण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी कन्स्ट्रक्शन टीडीआरचा लेआउटमधील वापर केला जाणार आहे. जुन्या रस्त्यांसाठीही टीडीआरचा वापर करता येणार असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे