ब्रेकिंग

लिफ्ट अचानक खाली आल्याने महिला गंभीर जखमी नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेज मधील घटना 

लिफ्ट अचानक खाली आल्याने महिला गंभीर जखमी नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेज मधील घटना

 

 

आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी (दि. २७) सकाळी ऑपरेशन थिएटरसाठी साहित्य वाहून नेणाऱ्या हॉइस्ट ट्रॉलीच्या मोकळ्या जागेतून डोकावून पाहणारी महिला कर्मचारी ट्रॉलीचा फटका लागून गंभीर जखमी झाली.

 

ज्योती शिवाजी आहिरे (वय ५०, रा. मानेनगर, अमृतधाम) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती आहिरे या रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी कामावर असताना शस्त्रक्रियेचे छोटे-मोठे साहित्य ने-आण करणारी ट्रॉली नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ट्रॉलीच्या पॅसेजमधून डोकावून

 

ऑपरेशन थिएटरचे साहित्य वाहून नेणारी दुर्घटनाग्रस्त हॉइस्ट ट्रॉली.

पाहिले. दुर्दैवाने त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून ट्रॉली वेगाने खाली आली आणि ट्रॉलीचा जोरदार फटका बसून त्यांचे डोके ट्रॉलीखाली अडकले. कर्मचाऱ्यांनी तातडीने आहिरे यांना ट्रॉलीमधून बाहेर काढून अतिदक्षता विभागात दाखल केले. आडगाव

 

पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानुसार पोलिसांनी वैद्यकीय अपघात तक्रारीची नोंद केली. दरम्यान, ज्योती आहिरे यांच्या मुलाने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, पोलिस सत्यता पडताळत आहेत.

 

पोलिस म्हणतात…

 

दुर्घटना घडली ती लिफ्ट नसून, ऑपरेशन थिएटरमधील साहित्य आणि जेवणाची ताटे नेण्यासाठीची यंत्रणा आहे, अशी माहिती आडगाव पोलिसांनी दिली. ‘सीसीटीव्ही’ तट्रॉलीमध्ये काहीही विघाड नसल्याचे दिसते. ट्रॉलीच्या जाळीनंतर सुरक्षित दरवाजा नव्हता. तो कधीपासून नव्हता, त्याचा तपास सुरू आहे.

 

महाविद्यालय म्हणाले…

 

अपघात झाला ती लिफ्ट नसून, हॉइस्ट ट्रॉली आहे. शासकीय विद्युत अभियंत्यांनी घटनास्थळी पाहणी केली. ट्रॉली कोसळली किंवा त्यात तांत्रिक बिघाड नाही. दुर्घटनेपूर्वी संबंधित महिला घटनास्थळी ड्रम घेऊन उभी होती. मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता सुरक्षा सीमारेषा ओलांडून ती ट्रॉली मार्गात डोकावून पाहत असताना ही दुर्घटना घडली, असा दावा वैद्यकीय महाविद्यालयाने केला आहे. त्या घटनेने नाशिक शहरात खरवड आली असून मागे काही दिवसांपूर्वी अशीच घटना झाली होती. नाशिक शहरातील जवळपास 50 टक्के लिफ्टमध्ये वाईट परिस्थिती असून लिफ्ट मधील वेग कमी करणाऱ्या स्प्रिंगा खराब झालेले आहेत. मेंटेनन्स अभावी अनेक सोसायटीमध्ये लिफ्ट परिस्थिती खराब झालेले आहे. नाशिक शहरात सध्या तपासणी मोहीम हाती घेतले असून फक्त दहाच कर्मचारी असल्याचे बोलले जाते  कृपया नागरिकांनी येतात त्यांना लिफ्ट मधून काळजी घ्यावी. असं नाशिक जनमत करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे