मिशन ग्रीन मान्सून उपक्रमांसाठी नाशिककर सरसावले ! ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप. –

मिशन ग्रीन मान्सून उपक्रमांसाठी नाशिककर सरसावले ! ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप
८ हजार हून अधिक नागरिकांनी केली रोपांसाठी नोंदणी, पाचव्या टप्प्या अखेर 33 हजार पेक्षा अधिक वृक्ष लागवडीस सुरुवात
—————————————-
नाशिक जनमत (दि२६ जुलै २०२६) कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत नाशिक शहराला हरित व समृद्ध बनवण्यासाठी नाशिक कर सरसावले आहेत.’मिशन ग्रीन मान्सून’ मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेच्या ५ व्या टप्प्यामध्ये म्हणजेच पाचव्या रविवारी नाशिककरांनी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून मागवलेल्या ८,७५० देशी रोपांचे थेट प्रभाग निहाय वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. त्यापैकी आज ३५०० नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना टप्प्याटप्प्याने प्रभाग निहाय वाटप करण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी विशेष क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आजअखेर ८,७५० वृक्षांची मागणी नोंदवण्यात आली आहे. या मागणीनुसार काल पाचव्या टप्प्यात प्रभागातील नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाच्या माध्यमातून नागरिकांना ही देशी रोपे पुरवण्यास सुरुवात करण्यात आली.
‘मिशन ग्रीन मान्सून’च्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांत 33 हजारांहून अधिक झाडे लागवडीस सुरुवात झाली आहे: *पहिला टप्पा*: सातपूर देवराई आणि शिंदे ग्रामपंचायत हद्दीत एकूण ५,००० वृक्षारोपणाने मोहिमेचा शुभारंभ. *दुसरा टप्पा*: म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) व त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी परिसरात ६,००० वृक्षांची लागवड. *तिसरा टप्पा*: ऐतिहासिक नंदिनी नदीच्या दुतर्फा ६,००० देशी वृक्षांचे हरित संरक्षण कवच. *चौथा टप्पा*: दऱ्याई माता परिसर (दरी) येथे ५,००० आणि पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र परिसरात २,००० झाडे लागवडीस प्रारंभ.
आजच्या पाचव्या टप्पे अखेर 8500 झाडांपेक्षा अधिक वृक्षांचे घरपोच वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.
या वाटपा दरम्यान ओएसडी संदीप जाधव यांच्या फोनद्वारे ना. गिरीष महाजनांनी नागरिकांशी संवाद साधला आणि नाशिक शहराला निसर्गरम्य बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या प्रभागात मिळालेल्या झाडांचे योग्य ठिकाणी लागवड करून संवर्धन करण्याबाबत आवाहन केले.

वृक्ष वाटपाच्या या कार्यक्रमात महापौर हिमगौरी आहेर अडके नगरसेवक सुधाकर बडगुजर, योगिता हिरे, राहुल गणोरे, श्वेता भंडारी, सीमा पवार, राजेश पंडित, मनोज साठे ,चंदू पाटील व मनपा उद्यान विभागातील विवेक भदाणे , प्रशांत परब सचिन देवरे, श्रीकांत इर्नक आशुतोष वरपे व तसेच प्रभागातील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
–



