ब्रेकिंग

रस्त्यातच ट्रॅक्टरच चाक निघाले. अंबड सातपूर लिंग रोड ची घटना.

ट्रॅक्टरचे चाक अंबड-लिंक रोडवर टायर खड्ड्यामुळे निघाले.

नाशिक जनमत काल दुपारच्या सुमारास अंबड लिंक रोडवर पडलेल्या खड्ड्यामुळे एका ट्रॅक्टरचा चालू अवस्थे पाणी असलेल्या खड्ड्यात निखळले. प्रसंग वधान राख खत ड्रायव्हरने ट्रॅक्टर एक्सेल वर  रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यामुळे कोणती जीवित हानी  झाली नाही

शहरासह सातपूर भागात कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यांचे वाभाडे काढले आहेत. एमआयडीसी परिसरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहने चालविताना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

प्रभाग क्र. २६ मधील पपया नर्सरी ते एक्स्लो पॉईंट मार्गावर खड्ड्यांमुळे एका ट्रॅक्टरचा टायर निखळल्याची घटना नुकतीच घडली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टर फक्त एक्सलवर चालवत रस्त्याच्या कडेला उभा केला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे विशेष महासभा बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे